shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नई जिंदगी येथील एमआयएम चे शाकिर सगरी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश..!



जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाॅटसॲप - ९७६८४२५७५७

साेलापूर : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे व शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नई जिंदगी येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार प्रणिती शिंदे व शहर अध्यक्ष प्रकाश वाले व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयएम चे सोलापूर महानगरपालिकेचे परिवहन सदस्य शाकिर सगरी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या कॉंग्रेस पक्ष सर्व जातीधर्माना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून कॉंग्रेस पक्षाने आज पर्यत अल्पसंख्यांक, दिन, दलित समाजातील अनेकांना मोठ मोठ्या पदावर संधी दिली. कधीही जातीपातीचा विचार केला नाही. 

एमआयएम हे मतविभागणी करून भाजपला राजकीय फायदा करून देणारा पक्ष आहे. म्हणून कॉंग्रेस पक्षाला आपल्या साथीची गरज आहे. शाकिर सगरी यांनी गोरगरीबांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या समर्थकांह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठीमागे कॉंग्रेस प्रक्ष खंबीरपणे उभा राहणार आहे.

यावेळी सोमपा गटनेते चेतनभाऊ नरोटे, नगरसेवक रियाजभाई हुंडेकरी, दक्षिण युवक कॉंग्रेस अध्यक्ष सैफन शेख, जुबेर कुरेशी, नुरुद्दीन मुल्ला, तिरुपती परकीपंडला, असिफ तिम्मापुरे, मन्सूर गांधी, अजहर शेख, कलीम तिम्मापुरे, रफिक फिरजादे, अझरोद्दीन हिरापुरे, शशी साठे, रहीम काझी, मोहसीन शेख, रियाज चौधरी, मुस्तफा खान, कदिर शेख, जब्बार घिवालो, सादिक तबलेवाले यांच्यासह त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close