shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी-चिंचवड शहरात नवरात्र उत्सवानिमित्त पिंपरी युवासेने कडून सामाजिक उपक्रम..!


पिंपरी चिंचवड:- पिंपरी युवासेनेकडून नवरात्र उत्सवानिम्मित विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. दिनांक 8 ऑक्टोबर व 9ऑक्टोबर रोजी सर्व शासकीय दाखले (जातीचा दाखला,रहिवाशी दाखला,उत्पन्न दाखला, नॉन क्रीमीलअर दाखला,) हे नागरिकांना मोफत काढून देण्यात येणार आहे. तसेच 10ऑक्टोबर रोजी मोफत पॅनकार्ड व रेशन कार्ड मध्ये नाव वाढविणे, कमी करणे, पत्ता बदल, नवीन, दुरुस्ती करून देण्यात येणार आहे. दिनांक 11 ऑक्टोबर ते 14ऑक्टोबर पर्यंत आयुष्यमान भारत योजना राबविण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची वेळ सकाळी 10 ते 6 पर्यंत असणार आहे.निलेश हाके जनसंपर्क कार्यालय,एस. बी. पाटील स्कूल रोड सुखवानी ग्लोरी बिल्डिंग जवळ कार्यक्रमचे स्थळ आहे. तरी प्रभाग क्रमांक 30 फुगेवाडी -दापोडी -कासारवाडी मधील जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या उपक्रमा मध्ये सहभागी व्हावे असे पिंपरी युवासेनेचे युवाअधिकारी श्री. निलेश हाके ह्यांनी केले आहे.अधिक माहिती साठी 8806720672,7276970972, संपर्क साधावा.
close