shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तहसील कार्यालयावर रिपाइंची धरणे आंदोलन संपन्न..!!



-------------------------------------------------------
 प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रु अनुदान द्यावे. मराठा व ओबीसी आरक्षण आणि शेतमजूर यांनाही अनुदान देण्यात यावे. या आणि इतर मागणीसाठी केज तालुका रिपाईंच्या वतीने २० ऑक्टोबर रोजी केज तहसील कार्यालया समोर धरणे करण्यात आले.


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले आणि युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशा नुसार दि. २० ऑक्टोबर रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे. ओबीसी समाजाचे रद्द झालेले राजकीय आरक्षण देण्यात यावे. त्याच बरोबर या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून महाराष्ट्र शासनाने हेक्‍टरी १० हजार रुपये जाहीर केलेली मदत; ही अत्यंत तोकडी व कमी आहे. म्हणून राज्य शासनाने याचा फेरविचार करून कोणत्याही सर्वेक्षणाची वाट न पाहता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयाचे नुकसान भरपाई देण्यात यावी. त्याच बरोबर भूमिहीन व शेतमजूर यांनाही नुकसान भरपाई अनुदान देण्यात यावे. तसेच मागासवर्गिय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीतील आरक्षण पूर्ववत सुरू ठेवून त्याचा लाभ द्यावा. या आणि इतर मागण्यासाठी करिता आम्ही केज तहसील कार्यालया समोर तालुका अध्यक्ष दीपक कांबळे आणि जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. 


या आंदोलनात गोवर्धन वाघमारे, भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान केदार, केज विकास संघर्ष समितीचे प्रा. हनुमंत भोसले, भाई मोहन गुंड, राहुल सरवदे, रवींद्र जोगदंड, भाजपचे नेते दत्ता धस, नगरेवक शेषेराव कसबे, भास्कर मस्के, रमेश निशिगंध, बाळासाहेब ओव्हाळ, विकास आरकडे, गौतम बचुटे, दिलीप बनसोडे, कैलास जावळे, अजय कांबळे, संभाजी हजारे, मिलिंद सुमित, कांबळे बाळासाहेब, कांबळे भालेराव, बाबासाहेब शिंदे, माऊली इंगळे हे सहभागी झाले होते.


आंदोलन स्थळी मित्र पक्षाच्या नेत्यांच्या भेटी :- आंदोलनाच्या ठिकाणी भाजपाचे जिल्हा सचिव दत्ता धस, तालुका अध्यक्ष भगवान केदार, वैद्यकीय आघाडी भाजप बीड जिल्हाध्यक्ष डॉ वासुदेव नेहरकर, शेकापचे भाई मोहन गुंड, केज विकास संघर्ष समितीचे प्रा हनुमंत भोसले नगरसेवक शेषेराव कसबे, शिंदे यांनी भेट दिली.

------------------------------------------------
close