shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समविचारी पक्षांना बरोबर घेऊन निवडणुकींना सामोरे जाणार...संदीप वर्पे..!!


शिर्डी नगरपंचायतीच्या येणार्‍या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची  बैठक संपन्न झाली..अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शिर्डी नगरपंचायतीच्या येऊ घातलेल्या निवडणूकीसंदर्भात कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला..


याप्रसंगी नीलेश कोते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महाविकास आघाडी करूनच निवडणुकीस सामोरे जाणे गरजेचे आहे..राष्ट्रवादी काँग्रेस वरीष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचा कायम मान राखत असतो परंतु कोणी जर आडमुठी धोरण स्वीकारत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील वेगळा विचार करू शकते याचे भान देखील सर्वानीच ठेवले पाहिजे. शिर्डीतील शिवसेना नेते आघाडी करण्यासंदर्भात सकारात्मक असून राष्ट्रवादी काँग्रेस सर्व शक्तिनिशी या निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे नीलेश कोते यांनी स्पष्ट केले ..

जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर म्हणाले की महाविकास आघाडी झाली पाहिजे पण यासाठी तीनही पक्षात योग्य ताळमेळ बसणे आवश्यक आहे यासाठी प्रमुख नेते मंडळींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे..

अध्यक्षीय भाषणात संदीप वर्पे म्हणाले की पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार राहता आणि शिर्डी शहराची बैठक घेऊन येणार्‍या निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका मांडली.समविचारी पक्षांना बरोबर घेऊन यावेळी निवडणूकीस सामोरे जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले परंतु कोणी यामधे मिठाचा खडा टाकत असेल तर निश्चितच त्यास योग्य समज देण्यासाठी त्या त्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी पुढे येणे गरजेचे आहे..आजच्या घडीला महाविकास आघाडीसाठी वातावरण पोषक असून योग्य ताळमेळ बसला तर नक्कीच राहता आणि शिर्डीमध्ये बदल घडू शकेल..

केंद्र सरकारची शेती विरोधी धोरणे आणि वाढती महागाई या विरोधात जनतेच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे यामुळे निश्चितच महाविकास आघाडी एक योग्य पर्याय व सक्षम पर्याय म्हणुन जनतेसमोर आला आहे..

आभार शहर अध्यक्ष महेंद्र शेळके यांनी मानले..
यावेळी तालुका अध्यक्ष सुधीर म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, शहर अध्यक्ष महेंद्र शेळके, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, मा.उपनगराध्यक्ष नीलेश कोते,युवक तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, सुनील गोंदकर, अमित शेळके, राकेश कोते, साई कोतकर, प्रकाश गोंदकर, दीपक गोंदकर, किरण माळी, राहुल कुलकर्णी, गणेश गोंदकर,अनिल कोते, समीर शेख, विशाल कोते,नीलेश शिंदे, दीपेश वारियर, फरहान शेख, रामा शेवाळे, सिद्धार्थ गोतीस,राहुल फुंदे आदी उपस्थित होते..
close