शिर्डी । प्रतिनिधी :
श्री साईबाबांचे मंदिर ७ ऑक्टोंबरला उघडण्याचे आदेश आल्याने साईभक्त मध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु ऑनलाईन दर्शन व्यवस्थेमुळे आजही अनेक भाविकांना शिर्डीतून पासही मिळत नसल्याने कळसाचे दर्शन घेऊन माघारी जावे लागत आहे. जे काही साईभक्त ऑनलाईन दर्शन पास बुकिंग करून दर्शन घेत आहेत.
साई भक्तांची ऑनलाईन पास काढण्यासाठी हाल-अपेष्टा धावपळ केली जात आहे व इतर ठिकाणी जास्त पैसे मोजावे लागत आहे. काहींचे मोबाईलवर पास काढताना सरोवर काम करत नाही. मंदिर उघडले म्हणून चला दर्शनाला असे म्हणून येतात व येथे आल्यावर समजते की ऑनलाईन असल्यावर दर्शन करता येईल. काही भक्तांना प्रिंट काढायचे पैसे घेतले जातात तर काही ऑनलाइन बुकिंग करायची पैसे घेतात. साईबाबा संस्थाने ऑनलाईन पास देण्याची सुविधा करावी. काही रोजचे चार-पाचशे भक्त बाहेरून कळसाचे दर्शन घेऊन जात आहे.
तरी राहता तालुक्याचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ऑफलाईन दर्शन सुरू करण्यासाठी सूचना प्रशासनाला विनंती करावी असे राहता तालुका मुस्लीम सेवा संघचे गफ्फारखान पठाण म्हणाले.

