अन्यथा नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या दालनासमोर शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटना, साकुर पठार भागातील जनतेसह आंदोलन करणार- शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील
संगमनेर । प्रतिनिधी :
खड्डेमय रस्त्यांबाबत पाठपुरावा व रस्त्यात वृक्ष लागवड आंदोलन करून देखील संबंधित खात्याचे अभियंता कुठलीही दखल घेत नाहीत. त्यामुळे रस्त्यांची कामे रखडलेले आहेत. त्यांनी जलद गतीने सुरू करावे शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटना अनेक वेळा पाठपुरावे करुन देखील त्यांवर कोणताच निर्णय घेतला नाही.यामुळे साकुर पठार भागातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. ते दुरुस्त करणे, आता काळाची गरज आहे.
साकुर पठार भागात अनेकांना लहान मोठ्या अपघातांना दररोज सामोरे जावे लागते. मात्र शेतकऱ्यांना, मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांना अनेक अपघात होतात. त्यामुळे सर्व सामान्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते.
खराब झालेले रस्ते
१) रणखांब फाटा ते दरेवाडी ;२) साकुर ते नांदुर खंदरमाळ; ३) साकुर ते बिरेवाडी फाटा; ४) मांडवे बु ते वरवंडी.
या खड्डेमय रस्त्यांत दिनांक २७/९/२०२१ रोजी वृक्षलागवड आंदोलन करून देखील संबंधित अभियंत्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. यांमध्ये दोषी असणारे सबंधित कार्यकारी अभियंता तसेच अधिकारी यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
खड्डेमय रस्त्यांची तातडीने पण दिर्घकाळ टिकेल अशी दुरुस्ती न झाल्यास साकुर पठार भागातील जनता आणि शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मा.विभागीय आयुक्त नाशिक यांचे दालनात आंदोलन करण्यात येईल.
असा इशारा साकुर पठारभागातील त्रस्थ नागरिक व शिवप्रतिष्ठाण संघटनेच्या वतीने शिंवश्री राहुल ढेंबरे पाटील यांनी दिला आहे,
सदर निवेदन जिल्हा परिषद अहमदनगर ,मुख्य कार्यकारी अधिकारी, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी,
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल,विभागीय आयुक्त,नाशिक,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री, महाराष्ट्र राज्य,महसुलमंत्री महाराष्ट्र राज्य,
खासदार शिर्डी लोकसभा यांना निवेदन देण्यात आले आहे.

