इंदापूर येथे श्री ओम सीएनजी इंजीनियरिंग ऑटोमॅटिव या नूतन वर्कशॉपचे उद्घाटन संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथील टेंभुर्णी नाक्याजवळ अक्षय हेगडकर यांच्या श्री ओम इंजीनियरिंग ऑटोमॅटिव वर्कशॉपचे उद्घाटन दिनांक १८ ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत अभियान पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र रेडके तसेच माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम देशमुख ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रासपा माऊली सलगर, कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर माजी सभापती पांडुरंग मारकड, कर्मयोगी कारखान्याचे संचालक कुबेर पवार, तेजपृथ्वी ग्रुपचे संस्थापक मार्गदर्शक नानासाहेब खरात, चाकाटी ग्रामपंचायतचे सरपंच संजय रुपनवर, रासपाचे तालुका अध्यक्ष सतीश तरंगे, विधानसभा अध्यक्ष मनीष जाधव, शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते, युवा नेते माणिक मारकड, मोहोळ तालुका उपाध्यक्ष परमेश्वर कोळेकर, बाळासाहेब चंदनकर, आप्पा माने, दुर्योधन पाटील, संदीप रेडके, गणेश शिंगाडे, सचिन देशमुख, इंद्रजीत देशमुख, अमित पाटील, आप्पा चंदनकर, बाळासाहेब कोडे, अमोल पाटील, राजेंद्र मारकड, बापूराव हांडे , अक्षय मारकड इत्यादी उपस्थित होते.
यावेळी महेंद्र रेडके म्हणाले की, ग्रामीण भागातील युवकांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर नाविन्यपूर्ण व्यवसायामध्ये पदार्पण करून आपले जीवन सुखमय करावे आपल्या अडचणीच्या काळात आपल्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभा राहू असे आपले मत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
तसेच माऊली सलगर यांनी ग्रामीण भागातील युवकांनी उद्योगधंदा व व्यवसायात आपले स्थान निर्माण करावे आणि या युवकांना व्यवसाया मध्ये प्रगती करावी असा संदेश देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नानासाहेब खरात म्हणाले की, ग्रामीण भागातील युवकांनी शहरी भागात येऊन आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवावा काही जण त्यांना अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यासाठी या युवकांच्या पाठीशी सर्वांनी मिळून खंबीरपणे उभा राहून त्यांच्या यशामध्ये हातभार लावण्याचा प्रयत्न करावा अशीच प्रगती सर्व युवकांनी करावी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या नवीन वर्कशॉपला आबासाहेब मारकड, मनीष जाधव, श्रीनिवास सातपुते इत्यादी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान या उदघटना कार्यक्रमास
शिवाजीराव पाटील सोलापूर जिल्हा परिषद सदस्य, किरण गोफणे पुणे जिल्हाध्यक्ष रासप, दत्तात्रय पांढरे, प्रवीण भैय्या हरणावळ,विजय वाघमोडे नगरसेवक इंदापूर यांनी उपस्थिती दर्शविली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष नरुटे यांनी केले तर आभार गणेश हेगडकर यांनी केले.

