कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी हर्षवर्धन पाटील यांची तर व्हा चेअरमन पदी भरत शहा यांची बिनविरोध निवड.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भाजप नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व व्हा चेअरमनपदी इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक
भरत शहा यांची बिनविरोध निवड (२९ ऑक्टो) रोजी झाली आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यात यशस्वी ठरले असून त्यांची चेअरमनपदी निवड झाल्याने पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे ,नीरा भीमा साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार , उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील,देवबा जाधव, कुबेर पवार, तसेच नवनिर्वाचित संचालक हनुमंत जाधव, रवींद्र सरडे, शांतीलाल शिंदे, छगन भोंगळे ,बाळासाहेब पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे ,प्रवीण देवकर ,रतन देवकर, शारदा पवार ,कांचन कदम ,केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरालाल पारेकर वसंत मोहोळकर इत्यादी उपस्थित होते.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिरूर चे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख होते.

