shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरेंचा महाराष्ट्रातील जनतेला शब्द ; निश्चिंत रहा, ती वेळ आजिबात येऊ देणार नाही..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
अहमदनगर: १२ ऑक्टोंबर २०२१.
         ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे अहमदनगर दौ-यावर होते . दरम्यान त्यांनी अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.दसरा दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट गडद झाले आहे.
अशा परिस्थितीत राज्यावर वीज निर्मितीचं संकट असलं तरी लोडशेडिंगची वेळ येऊ देणार नाही”, असा विश्वास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.लोडशेडिंगच्या संकटापासून वाचवण्याचे आमचे प्रामाणिक प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय.


 
वीज निर्मिती कंपन्यांकडून चढ्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांना पुरवली जात आहे. आगामी काही दिवसातच सर्व सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारच्या कोळशाच्या खाणीतील मजदूरांचा संप तसेच पाऊस आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले भाव त्यामुळे कोळशाची

कमतरता असल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र ग्राहकांवर आम्ही कोणताही परिणाम होऊ देणार नाही. वीज निर्मितीसंबंधी कामे आम्ही डोळ्यात तेल घालून करु , अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
         देशात कोळशाचे विक्रमी उत्पादन झाले असले तरी, अतिवृष्टीमुळे कोळशाच्या खाणींपासून वीजनिर्मिती युनिटपर्यंत इंधनाच्या वाहतुकीवर लक्षणीय परिणाम झाला आहे. गुजरात, पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये वीजनिर्मितीवर त्याचा परिणाम झाला आहे.

           कोळशाच्या संकटामुळे पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, झारखंड, बिहार आणि आंध्र प्रदेशमध्येही वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील परळी येथील वीज निर्मिती केंद्रावर देखील प्रभाव पडला आहे.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close