shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांच्या हस्ते जय भवानी मित्र मंडळ वडापुरी येथील तुळजाभवानी देवीची आरती संपन्न.

युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांच्या हस्ते जय भवानी मित्र मंडळ वडापुरी येथील तुळजाभवानी देवीची आरती संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:  वडापुरी येथील  जय भवानी मित्र मंडळाच्या  तुळजाभवानी देवीची आरती युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांच्या हस्ते दि. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी संपन्न झाली.
यावेळी आरती झाल्यानंतर इंगळे यांचा सत्कार मंडळाचे सदस्य सुनिल गहिनीनाथ जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मंडळाचे मार्गदर्शक वामन वसंत नलवडे , माजी शाखा अभियंता दादासाहेब काळे, शिवसेना शाखा वडापुरीचे अध्यक्ष प्रशांत तोबरे, तसेच गावातील मान्यवर आणि जय भवानी मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
 वडापुरी गावातील सार्वजनिक नवरात्र उत्सवानिमित्त जय भवानी मित्र मंडळ गेली एकवीस वर्षापासून हा नवरात्र उत्सव साजरा करीत आहे. या मित्र मंडळाच्यावतीने तुळजापूर येथून ज्योत प्रज्वलित करून ते वडापुरी पर्यंत धावत आणली जाते. नवरात्र उत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून भक्तिमय वातावरणात या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. सर्वधर्मसमभावाचा मीलाप या ठिकाणी पाहण्यास मिळतो.
close