shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीगोंदा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या १२ तासात जेरबंद..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार,२९ ऑक्टोबर , २०२१
श्रीगोंदा : तालुक्यातील तांदळी दुमाला गावाच्या शिवारात श्रीगोंदा पोलिसांची शोधमोहीम सुरू असताना यवत पोलीस ठाण्यात फिर्यादी सायराबानो नुरोद्दीन शेख (रा. पाटस ता. दौंड) यांना चाकूचा धाक दाखवून ७७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहे अशी फिर्याद दाखल करण्यात आली होती. 
त्यातील काही आरोपी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्याची खबर मिळाल्यावर श्रीगोंदा पोलिसांनी शोध पथक पाठवून विक्रम उर्फ बापू सर्जेराव भैलुमे (वय ३० वर्षे, रा. आढळगाव ता. श्रीगोंदा), अजय उर्फ साजन मोहन काळे ( वय वर्षे २१, रा. तांदळी दुमाला ता. श्रीगोंदा), सौरभ शिका चव्हाण (वय २६ वर्षे, रा. राहुरी) व निलेश रवींद्र काळे (वय २१ वर्षे, रा. गटेवाडी ता. पारनेर) यांना ताब्यात घेऊन आरोपींना यवत पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, सहाय्यक फौजदार अंकुश ढवळे, पोलीस हवालदार गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादासाहेब टाके, अमोल कोतकर व यवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार जगताप, हवालदार गायकवाड, जगताप यांनी कामगिरी केली.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close