shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वर्षपूर्ती सक्षम व यशस्वी अध्यक्ष योगेश आण्णा गोंदकर..!!

आयुष्याच्या पटावरचा यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागेल...


यशस्वी अध्यक्ष योगेश आण्णा गोंदकर

वर्षपूर्ती सक्षम अध्यक्ष आज माझे मार्गदर्शक मोठा भाऊ एक ध्येयनिष्ठ सहकारी मा. श्री. योगेश अण्णा यांचा अध्यक्ष नियुक्तीला एक वर्ष पूर्ण झाले...




यानिमित्ताने आपल्याबद्दल व्यक्त होताना अभिमान वाटतो की, आज आपण स्वकर्तुत्वाने यशाचे शिखर सर करताय, आपल्या सामाजिक कार्यातून राजकारणाची वाट शोधणारा युवा कार्यकर्ता योगेश आण्णा आम्हा कार्यकर्त्यांसाठी आदर्श आहे.

बालपणापासून संघ स्वयंसेवक म्हणून स्वीकारलेले समाजसेवेचे व्रत आपण आजही निस्वार्थी भावनेने करत आहात. या बरोबरच प्रत्येकाशी हसत-खेळत सुसंवाद साधत, प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन मित्र परिवाराची मोठी साखळी देखील आपण निर्माण केली आहे. माझे राजकीय गुरू मार्गदर्शक भाजपा जिल्हाध्यक्ष मा.श्री. राजेंद्र भाऊ गोंदकर मार्गदर्शनात त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण धडाडीने काम करत आहात, शिर्डी लोकसभा असो, विधानसभा असो वा शिर्डी नगरपंचायत असो आपल्यावर दिलेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

आपण थॅलेसेमिया या अनुवंशीक रक्तरोग्यांसाठी (लहान मुलांना) व साईबाबा हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या बाहेरील रुग्णांना रक्त मिळावं म्हणून  आजपर्यंत आपण निस्वार्थी भावनेने प्रयत्न करत आहात हीच खरी श्री साईबाबांची भक्ती आहे...

कोविड१९ सारख्या जागतिक महाभारी मध्ये आपण राहता तालुक्यातील अंध-अपंग बांधवांना किराणा वाटप, तसेच पंडित दीनदयाळजी उपाध्याय अंत्योदय योजनेअंतर्गत रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे, तसेच आत्मनिर्भर भारत प्रधानमंत्री पथ विक्रेता योजनेअंतर्गत होतकरू अंध-अपंग बांधवांना व शिर्डी शहरातील पथविक्रेत्यांसाठी आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्र सुरू करून दहा हजार रुपयाचे कर्ज मिळवून देण्याचा उपक्रम केला हे माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना नक्कीच प्रेरणादायी आहे.

या आपल्या कार्याची दखल घेऊनच समदृष्टी क्षमता विकास अनुसंधान मंडळ सक्षम या दिव्यांग संघटनेच्या नगर जिल्हा सचिव पदी आपली नियुक्ती झाली. या काळात आपण रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्तदानाबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली तसेच आपल्या सहकाऱ्यांकडूनमोठ्या प्रमाणात रक्तदान करून घेतले.

त्याबरोबरच या काळात लसीकरण मोहिमेत शिर्डी करांसाठी खूप मोठे कर्तव्य अण्णांनी पार पाडले लसीकरण व अण्णांचं जणू एक नातच बघायला मिळाले सर्व शिरडी करांना लस कोणती कुठे आहे कधी आहे याची संपूर्ण माहिती शिर्डी करांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आण्णा देत असे व आपण केलेल्या प्रयत्नांमुळे अंध अपंग नागरिकांकरिता संपूर्ण तालुक्यात प्रत्येक लसीकरण केंद्र मध्ये दहा टक्के राखीव करण्यात आली श्री साईबाबा संस्थानने सुरु केलेल्या लसीकरण केंद्रावर होणारी गैरसोय दूर करण्यात आण्णा खूप मोठे यश प्राप्त झाले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांची मोठी फळी शिर्डी शहरात निर्माण केली. पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता कसा असावा हे आपल्या कृतीतून आपण दाखवले, अनेक नविन मित्र जोडले या सर्व कार्याचा परिपाक म्हणूनच आपण भारतीय जनता युवा मोर्चाचे शिरडी शहराध्यक्ष नियुक्त झाला आहात.

अत्यंत कमी वयामध्ये आपण या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या शेवटी मातब्बर कार्यकर्ता घडण्याची परंपरा भारतीय जनता युवा मोर्चातच आहे...

आपल्या कार्याचा आलेख असाच वृद्धिंगत होत जावो याच माझ्या मनस्वी शुभेच्छा.. 


- लेखक : लखन बेलदार

( संघटन सरचिटणीस - भा.ज.यु.मो.शिर्डी शहर )

संकलन - तुषार महाजन. पत्रकार शिर्डी

close