इंदापूर प्रतिनिधी: (६ ऑक्टोबर २०२१)इंदापूर तालुक्यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या वर्षासाठी इंदापूर तालुक्यातील २५ गावांना सुमारे ३ कोटी २ लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
तालुक्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा / गावांचा विकास करण्यासाठी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी या कामांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती दिली. यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचे निगडीत स्थळे तसेच सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करणे त्यांची स्मारके उभारणे व सांस्कृतिक विकास घडवून आणणे वाचनालय अभ्यासिका उद्यान विकसित करणे व्यायाम शाळा कॉंक्रीट रस्ते बंदिस्त गटर हायमास्ट दिवे नळ पाणीपुरवठा योजना यांचा समावेश प्रामुख्याने होतो
इंदापूर तालुक्यातील खालील गावांना निधी देण्यात आला आहे.
बोराटवाडी ८ लक्ष निरगुडे १० लक्ष गोतंडी १३ लक्ष निरवांगी ५ लक्ष ,अंथुर्णे ३२ लक्ष ,भरणेवाडी ५ लक्ष ,निंबोडी ६ लक्ष ,सणसर ५ लक्ष, सपकळवाडी १५ लक्ष ,जंक्शन ५ लक्ष ,आनंदनगर ५ लक्ष ,अकोले ११ लक्ष, लोणी देवकर ८ लक्ष ,बोरी ३५ लक्ष, लाकडी २६लक्ष ,पोंधवडी ४ लक्ष, न्हावी २ लक्ष ,अगोती नं.२ ५ लक्ष, लासुर्णे २१लक्ष ,शिरसटवाडी १०लक्ष, चाकाटी ९ लक्ष ,जाचकवस्ती ७ लक्ष,शेळगाव २ लक्ष, वालचंदनगर ३०लक्ष,पिंपरी बुद्रुक २१लक्ष

