shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यातील बिजवडी जिल्हा परिषदेच्या शाळेला भोर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांची सदिच्छा भेट. पंचायत समिती भोरचे गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे व इंदापूरचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी केले बिजवडी येथील शिक्षकांचे कौतुक .

इंदापूर तालुक्यातील बिजवडी जिल्हा परिषदेच्या शाळेला भोर तालुक्याचे  गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे  यांची सदिच्छा भेट.

 पंचायत समिती भोरचे  गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे  व  इंदापूरचे  गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी केले बिजवडी येथील शिक्षकांचे कौतुक .

 
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यात भोर तालुक्याचे शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे या इंदापूर पंचायत समिती येथे (दि.११ ऑक्टोबर) रोजी आले असता   जिल्हा परिषद शाळा बिजवडी येथील शाळेमध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची सखोल माहिती सोनवणे  यांनी घेतली. 
यामध्ये साप्ताहिक ऑनलाईन कृतीपत्रिका , साप्ताहिक ऑफलाईन कृतीपत्रिका ,ऑनलाईन चाचण्या, ऑनलाइन झूम क्लासेस, स्टार ऑफ द वीक उपक्रम, गणित अध्ययन समृद्धी उपक्रम, स्माईली उपक्रम , इंग्रजी अध्ययन समृद्धी उपक्रम, कला कार्यानुभव उपक्रम, संगणक कक्ष, स्वच्छता विषयक उपक्रम, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, ओसरीवरील शाळा उपक्रम, फिरते वाचनालय उपक्रम इत्यादी उपक्रमांची माहिती शाळेतील शिक्षिका श्रीमती रुकसाना युसुफ शेख व श्रीमती इशरत हमीद मोमीन यांनी सांगितली.

कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवाहात टिकण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी केलेली व्हिडिओ निर्मिती , ऑनलाइन चाचण्या व ऑनलाईन खेळ निर्मिती, कृतीपत्रिका निर्मिती, लोकसहभागातून शैक्षणिक साहित्य निर्मिती या सर्व बाबींचा आढावा घेत शाळेतील शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
शाळेतील शिक्षकांचे तालुकास्तरीय ऑनलाईन शिक्षणातील योगदानाबद्दल अभिनंदन केले.
गटशिक्षणाधिकारी बामणे  यांनी तालुक्यातील ऑनलाईन शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या महिलांच्या विशेष योगदानाबद्दल माहिती दिली असता सोनवणे  यांनी तंत्रस्नेही महिलांबाबत गौरवोद्गार काढले. तालुक्यातील महिला शिक्षकांनी विद्यार्थी प्रति असणाऱ्या स्वतःच्या तळमळीतून डिजिटल शैक्षणिक क्रांती घडवून आणली आहे .तालुक्यामध्ये महिला तंत्रस्नेही शिक्षिकांचे लक्षणीय प्रमाण ही कौतुकास्पद बाब आहे याचा विशेष उल्लेख करण्यात आला.
गटशिक्षणाधिकारी बामणे  यांनी शिक्षण विभागाच्या सावित्रीच्या लेकी  या पुस्तकाविषयी माहिती सांगत तालुक्यातील ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण विषयक विविध उपक्रमांची माहिती दिली.
जिल्हा परिषद शाळा बिजवडी शाळेतील सौ वैशाली महादेव चव्हाण श्रीमती रुकसाना युसुफ शेख व श्रीमती इशरत हमीद मोमीन यांच्या कार्यासाठी गटविकास अधिकारी परीट  , गटशिक्षणाधिकारी बामणे  व तालुक्यातील समस्त शिक्षक बंधू भगिनींनी शुभेच्छा दिल्या.
close