बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन!!
================
प्रकाश मुंडे| बीड जिल्हा प्रतिनिधी :-
जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान,जय किसानचा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती बीड जिल्हा काँग्रेस कमेटीकडून शनिवार,दिनांक 2 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांचे विचार काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यापर्यंत पोहोचवू, गांधीजींनी जगाला दिलेले सर्वधर्मसमभाव,राष्ट्रीय एकात्मता,सत्य,अहिंसा,राष्ट्रप्रेम हे विचार नव्या पिढीसमोर ठेवून शेवटचा माणूस केंद्रबिंदू मानून सर्वांना सोबत घेवून काम केले जाईल.
महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्ञीजी यांना अभिप्रेत असलेला नवा भारत घडविण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न करूत अशी ग्वाही बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी दिली.यावेळेस किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष एॅड.माधव जाधव,काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष वसंतराव मोरे,अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक दाजिसाहेब लोमटे,काँग्रेसचे राज्य समन्वयक संजय वाघमारे,परळी युवक काँग्रेसचे ईश्वर शिंदे,किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे,अशोक देशमुख,राहुल मोरे,सतीश भगत,प्रविण सोमवंशी,अशोक पवार,धनंजय कोळगीरे,अक्षय सिरसट,रमेश कदम आदींसह काँग्रेस पक्ष पदाधिकार्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी अनिल औताडे यांची किसान काँग्रेसच्या अंबाजोगाई तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.उपस्थित बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख,किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष एॅड.माधव जाधव,किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे यांनी अनिल औताडे यांना निवडीचे पञ दिले.प्रारंभी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी कमिटीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी मान्यवरांनी विचार व्यक्त केले.शास्त्री व गांधी यांच्या जीवनातील ठळक प्रसंगांना उजाळा देऊन दोघांच्याही स्मृतींना उजाळा देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर शिंदे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार अशोक देशमुख यांनी मानले.

