shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजश्री शाहु विद्या मंदिर चा ३० वा वर्धापन दिन साजरा..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :- 


शहरातील राजश्री शाहु  विद्या मंदिर या शाळेच्या ३० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी स्वामी दयानंद प्रतिष्ठाण केज चे अध्यक्ष श्री राजेसाहेब देशमुख , अंकुश इंगळे , साहित्यिक दगडू दादा लोमटे , अनिल महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला . यावेळी शाळेच्या सर्व शिक्षकांचा कुटुंबासह सत्कार करण्यात आला एका आगळ्या वेगळ्या स्वरुपाचा कार्यक्रम घेतला . आजकाल संस्था निस्पृह चालवण एवढं सोप नाही अश्या काळात चांगली संस्था चालवत असल्याचे ऐकून खूप आनंद वाटला असे दगडू दादा लोमटे यांनी भावना व्यक्त केल्या . 




मागील एकोणतीसव्या वर्षी शहरातील जवळजवळ तीस पस्तीस जणांनी एकत्र येऊन स्वामी दयानंद प्रतिष्ठाण या संस्थेच्या स्थापने नंतर राजश्री शाहू विद्या मंदिर या शैक्षणिक संस्था सुरू केली व आज एक ते सात वर्गाची शाळा आहे शाळेच्या शिक्षक वृंदानी सुध्दा मेहनत घेतली व अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन पाया मजबुत करण्याचे काम केले आहे . सध्याच्या काळात जिथे संस्था चालवण एवढं सोप काम नाही , संस्था चालक व शेतकरी यांची अवस्था सध्या सारखीच आहे राजकीय संस्थाचालक व इतर संस्थाचालक या दोन्हीत फरक आहे , चांगली संस्था चालवण काम अवघड आसतानाही एक चांगली संस्था चालत आहे व तीसाव्या वर्धापन दिन प्रसंगी उपस्थित राहता आल याचा आनंद आहे जिथे चांगला संस्था चालक असतो तिथे चांगली गुणवत्ता घडते अशीही पुढे प्रगती व्हावी अश्या शुभेच्छा दिल्या . यावेळी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच शिक्षक वृंदाचे सहकुटुंब सत्कार करण्यात आला .

यावेळी  अंकुश इंगळे , अनिल महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले श्री राजेसाहेब देशमुख यांनी संस्था अध्यक्ष म्हणून  त्यांनी संस्थेच्या सर्व सदस्य व शिक्षक वृंद यांच्या योगदानाबद्दल कौतुक करत आभार मानले .प्रास्तविक जि बी गदळे यांनी केले सुत्रसंचालन विक्रम डोईफोडे यांनी केले आभार मुख्याध्यापिका सौ .चाटे यांनी मानले.

close