शिर्डी प्रतिनिधी: शिर्डी शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर प्रकार समोर आली असून शिर्डी येथील रेल्वस्थानकाच्या रेल्वे पोलिसांनी ३०सप्टेबर रोजी १०वाजेच्या सुमारास एका तरुणाच्या संशयीत हालचाली पहाता रेल्वे स्टेशन चे पोलीस निरीक्षक पी पी सिंग यांच्या पथकाने मनोज शर्मा दिल्ली असे नाव सांगत असलेल्या तरुणांची तिकीटाची चौकशी केली असता झडती दरम्यान अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे त्याच्या कडे वेगवेगळ्या नावाचे आधारकार्ड व संशयित दुसऱ्या नावाचा पासपोर्ट सापडल्याने त्याला ताब्यात घेऊन मनमाड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांच्यावर भादवी ४२०अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची कसुन चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पी पी सिंग यांनी दिली
सदर तरुण हा दिल्ली येथील असल्याचे सांगतो त्याची राहणीमान साधारण असुन गरीब दिसत असून त्याच्या बॅगेत एकाच नावाचे मोठ्या प्रमाणावर आधार कार्ड आणि बनावट पासपोर्ट मिळून आले आहे चौकशी केली असता तो स्वतःचे मनोज शर्मा असे नाव सांगत होता. त्याच्याकडील पासपोर्ट वर इम्रान ( अहमद )खान असे नाव असल्याने नाव प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत शिर्डी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्या तरुणास शिर्डी पोलिस स्टेशनला नेले आणि त्याची कसून चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्याने पासपोर्ट दुसर्या व्यक्तीचा असून तो पासपोर्ट सापडल्याचे त्याला सांगतो आहे
बनावट आधार कार्ड मोठ्या प्रमाणावर सापडल्याने आणि तो मोबाईल वरून झटपट बनावट आधार कार्ड बनवून देत असल्याचे रेल्वे पोलिसांच्या लक्षात आले आहे, मात्र सगळ्यात गंभीर बाब म्हणजे त्याच्याकडील सापडलेल्या पासपोर्ट हा अत्यंत संशयास्पद वाटल्याने रेल्वे पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्यास शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले त्यानंतर त्या तरुणाला मनमाड रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे भादवी ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरुणाकडील पासपोर्ट नेमका कोणाचा आहे आणि त्याचा शिर्डीत येण्याचा उद्देश काय होता या सर्व गोष्टींचा उलगडा पोलिस तपासात होईलच मात्र त्या पासपोर्ट वर अनेकवेळा बांगलादेशला जाण्या येण्याची नोंदी असल्याने प्रकरणाची गंभीरता वाढली आहे.काही दिवसांपूर्वी मुंबई येथे असेच नाव बदलून राहणाऱ्या तरुणाला दहशतवादी विरोधी पथकाने ताब्यात घेतले होते आणि अनेक धक्कादायक खुलासे त्या तरुणाच्या बाबतीत झाले होते मात्र आता चक्क शिर्डी सारख्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या ठिकाणी अश्या प्रकारे बनावट पासपोर्ट आणि मोठ्या प्रमाणावर बनावट आधारकार्ड सह तरुण रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पकडला गेल्याने यापुढे पोलिसांसह शिर्डीतील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी वाढली असून कोणीही संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास शिर्डी पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

