shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री गणेश सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या वतीने बाबासाहेब उगले यांचा सत्कार.!!

शिर्डी प्रतिनिधी :

श्री गणेश सहकारी साखर कारखानाचे अभ्यासू सभासद, नपावाडी गावचे मा.उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब उगले पाटील यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे राहाता तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्री गणेश सहकारी साखर कारखाना, गणेशनगर येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कारखानाचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, व्हा.चेअरमन प्रतापराव जगताप, संचालक ॲड रघुनाथ बोठे, आण्णासाहेब सदाफळ, राजेंद्र थोरात, मधुकर कोते, विशाल चव्हाण, सुदामराव सरोदे, विजयराव गोर्डे, जगन्नाथ चोळके, सुर्यकांत निर्मल, नितीनराव गाढवे, जालींदर निर्मळ, भाऊसाहेब शेळके, रामभाऊ कोते, कारखान्याचे कार्यकारी संचालक भागडे साहेब, नपावाडीचे मा.सरपंच अशोकराव धनवटे, मा.सरपंच ज्ञानदेव वहाडणे तसेच कारखाना कर्मचारी उपस्थित होते. तसेच माजी मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, मा.जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार शालिनी विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे उपाध्यक्ष बाबासाहेब उगले यांनी केले.




close