मोर्शी - उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी श्री.विनय शेलुरे यांची कन्या कृष्णा शेलुरे या विद्यार्थिनीने एव्हरेस्ट ऍब्याकस या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
एव्हरेस्ट संस्थेने मेडल सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कृष्णा शेलुरे ही इयत्ता पाचवी वर्गात श्री.शिवाजी प्रायमरी शाळा मोर्शीमध्ये शिकत आहे.
तिच्या या यशाबद्दल तिच्या सर्व शिक्षकांनी तसेच उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी, शिर्डी एक्सप्रेस चे संपादक श्री रमेश जेठे सर व मित्र परिवाराने कौतुक व अभिनंदन केले आहे.

