shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण : ११३..औषधी वृक्ष : चिंच


 
मराठीमध्ये चिंच, हिंदीमध्ये इमली, संस्कृतमध्ये अम्लिका,आमला तर इंग्रजीमध्ये Indian date, tamarind tree या नावाने हा वृक्ष ओळखला जातो.
 
चिंच हा वृक्ष सर्वत्र आढळतो याचे साल, पान, फुले, फळे व बी औषधासाठी वापरतात.चिंच हृदयासाठी शक्तिवर्धक, आतड्यांसाठी कृमिनाशक, पिकलेली चिंच खोकल्यासाठी उत्तम तसेच तहान भागवीते. घसा दुखत असेल तर उपयुक्त. शरीराचा जो भाग बधीर झालेला असेल तसेच अर्धांगवात झालेला असेल तेथे चिंचेची पाने वाटून लावावीत, चिंचेची पाने वाटून ती सूज आलेल्या जागी लावावी सूज उतरते. 

अशाच प्रकारे गजकर्णावरही चिंचेची पाने वाटून लावावी. नेत्ररोग तसेच खोकला, सर्दी, पडसे यासाठी चिंचेची फुले खावी. यकृत, अमाशय व आतडे यांच्या शैथिल्यात चिंचेचा वापर करतात. चिंचेची बी चिंचोका या नावाने ओळखली जाते. बीचे चूर्ण कामोत्तेजक आहे तसेच चक्कर येणे गरगरणे या आजारांवरही उपयुक्त आहे. चिंच रुचीवर्धक असून चटणी, सॉस, चिंचेचे पाणी करून वापरतात. सुज झालेल्या ठिकाणी पोटीस करून चिंचेच्या बीचे चूर्ण लावावे.

चिंचेचे औषधी गुणधर्म समजून घ्या व आपल्या मित्र परिवारांना समजावून सांगा. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या पर्यावरण साक्षरता अभियानात सहभाग घ्या.

लेखक : चंद्रकांत शहासने निसर्गोपचारक
मोबाईल क्र : ९८८१३७३५८५
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या पर्यावरण साक्षरता मोहिमेंतर्गत प्रसारित
close