shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री भरणे यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने भाऊबीज म्हणून सर्व अंगणवाडी सेविका यांच्या हितासाठी उभारत असलेल्या पतसंस्थेसाठी २ लाख ५० हजार रूपये दिले.

राज्यमंत्री भरणे यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने भाऊबीज म्हणून सर्व अंगणवाडी सेविका यांच्या हितासाठी उभारत असलेल्या पतसंस्थेसाठी २ लाख ५० हजार रूपये दिले.



 इंदापूर प्रतिनिधी:अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी संघटना सी टु सलग्न इंदापूर तालूका नूतन अध्यक्षा बकुळा शेंडे व पदाधिकारी यांनी आज दि.२४ ऑक्टोंबर रोजी  राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली.
यावेळी संघटनेच्या पदाधिकारींनी  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना अंगणवाडी कर्मचारी भगिनींच्या भविष्यासाठी शरद समृद्धी महिला नियोजन पतसंस्था सभासद नोंदणी व उभारणीची माहिती दिली. 
यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने भाऊबीज म्हणून सर्व अंगणवाडी सेविका यांच्या हितासाठी उभारत असलेल्या पतसंस्थेसाठी २ लाख ५० हजार रूपये रोख स्वरूपात दिले. 
यावेळी इंदापूर तालूका संघटनेच्या अध्यक्षा बकुळा शेंडे, उपाध्यक्षा सुदर्शना भुजबळ, सचिव बालिका राऊत यांनी राज्यमंत्री भरणे यांचे आभार मानले.
close