shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रा.डॉक्टर सुनयना राहुल विखे पाटील यांना डॉक्टरेट पदवी प्रधान..!!



शिर्डी प्रतिनिधी :

लोणी येथील प्रा डॉक्टर सुनयना राहुल विखे पाटील या प्रवरा ग्रामीण औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय लोणी यामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदावर काम करत आहे . फार्मसुटिकल सायन्सेस मधून यांना डॉक्टरेट पदवी प्रधान झाली आहे.




 त्यांनी प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या विद्यापीठातून "मधुमेह व कोलेस्ट्रॉल" या विषयावर त्यांनी हरबल संशोधन केले आहे. "प्रोटेक्टिवे इफेक्ट्स ऑफ स्त्रिगा अँड फेरोनिया  इन डायबेटिक रेट्स" हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. सदर संशोधनात त्यांना प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ.व्ही.एन.मगरे सर व डॉ. राहुल कुंकूलोळ सर, डॉ. जंगले सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा सुनयना यांनी डॉक्टररेट पदवी संपादन केल्याबद्दल माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील, जि प माजी अध्यक्षा सौ शालिनी ताई विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र विखे पाटील, माजी मंत्री आणासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील, सुवर्णाताई विखे पाटील, धनश्री ताई विखे पाटील यांनी अभिनंदन केले.

close