सत्ता असो वा नसो मी नेहमीच जनतेचा सेवक, नागरिकांचा आणि माझा स्नेह राजकारणापलीकडचा आहे - रमेशराव आडसकर!!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
सत्ता असो वा नसो मी नेहमीच जनतेचा सेवक आहे नागरिकांचा आणि माझा स्नेह राजकारणा पलीकडील आहे शिक्षकांनी कोरोणा काळात केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन रमेशराव आडसकर यांनी आज धारूर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना व रमेशराव आडसकर प्रतिष्ठान आडस यांच्या संयुक्त विद्यमाने बाबुरावजी आडसकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श शिक्षक पुरस्कार व कोरोणा योद्धा पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा गौरव कार्यक्रम प्रसंगी केले
आज धारूर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये महाराष्ट्र प्राथमिक पुरोगामी शिक्षक संघटना बीड व रमेशराव आडसकर प्रतिष्ठान आडस यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते बाबुराव आडसकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ धारूर तालुक्यात मध्ये जिल्हापरिषद शाळे मध्ये अध्यापनाची उत्कृष्ट करणाऱ्या शिक्षक शिक्षिकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा कार्य गौरव करण्यात आला त्यात आदर्श शिक्षक
मुंडे शांतीनाथ पाटीलबुवा, देशपांडे चंद्रकांत भगवानराव,साखरे बालासाहेब नरसु ,सोनटक्के मनोहर रामभाऊ ,थोरात सदाशिव दसरथ,राठोड वसंत धाऊ,बडे बालासाहेब दत्तात्रय, देवकते गोविंद संभाजी ,सचिन क्षीरसागर,गोरे सटवा लिंबाजी ,पाचपिंडे संतोष मोतीराम, संजय पांडुरंग भुरे ,जाधव अंजली इंद्रजीत ,इरमले सुनिता
,मुख्याध्यापक शेख शब्बीर महमद, केंद्रप्रमुख बी के चाटे सर, माध्यमिक विभागभायमरे चांदबा बाळोजी,
तर कोरोना योद्धा पुरस्कार खालील व्यक्तींना देण्यात आला
जनार्धन विठ्ठलराव सोनवणे
, पत्रकारिता व शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पत्रकार नाथा ढगे सर ,पोलीस विभागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल साळवे सुनिता श्रीमंत यांना कोरोणा युद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी व्यासपीठावर माजलगाव मतदार संघाचे भाजपचे नेते रमेशराव आडसकर,पंचायत समिती धारूर चे सभापती हनुमंत नागरगोजे, कृषी उत्पन्न बाजार समिती धारूर चे सभापती सुनील शिनगारे, पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश कोकाटे,धारूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी , राजेश सोनावणे(तालुकाध्यक्ष आर.पी.आय) भाजपाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी मायकर ,ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन , रंजीत राठोड चेअरमन माजलगाव बँक, गदळे सर, संजय प्रदीप नेहरकर(संजय गांधी निराधार समिती धारुर), संपादक नागनाथ सोनटक्के, इत्यादी उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शेख असेफ यांनी केले एस डी थोरात , ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना बीड चे तालुकाध्यक्ष हनुमंत मंत्रे सर व रत्नाकर डोंगरे सर यांनी केले होते
यावेळी तालुक्यातील शिक्षक व शिक्षीका मोठया संख्येने उपस्थीत होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना बीड व रमेशराव आडसकर प्रतिष्ठान आडस चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थितांचे आभार महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे विकास आडागळे सर यांनी मानले या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन ज्योती शिंदे मॅडम यांनी केले

