shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सहयोग फाउंडेशन पुणे यांचा म.ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ.गायकवाड व डॉ.बिडवे यांना जाहिर..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

केज येथील बाबुरावजी आडसकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.ए.व्ही.गायकवाड व डॉ.टी.एस.बिडवे यांना पुणे येथील सहयोग फाऊंडेशनचा  म.ज्योतिबा फुले आदर्श प्राध्यापक पुरस्कार जाहिर झाला आहे.डॉ.गायकवाड व डॉ.बिडवे  यांनी  रासेयोच्या माध्यमातुन केलेल्या जल संधारण,स्वच्छता अभियान ,कोव्हीड जन जागृती व सुरक्षा इत्यादी कामामुळे जाहिर झाला आहे असे फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत मांडके यांनी पञाद्वारे कळविले असुन काही दिवसातच तो प्रदान होणार आहे.

   



केज तालुक्यातील आनंदगांव येथील पाणी फाऊंडेशनच्या कामात ही बाबुरावजी आडसकर महाविद्यालयातील रासेयोचा सहभाग होता.दोघांचेही विविध शोध निबंध प्रकाशित आहेत.पर्यावरण संवर्धन व पाणी या विषयावरही बीड आकाशवाणीवर त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.

     

या दोघांच्याही यशा बद्धल छञपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव रमेशराव आडसकर ,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रुशिकेष भैया आडसकर,शारदा शैक्षणिक संकुलच्या अध्यक्षा अर्चनाताई आडसकर,प्राचार्य डॉ.एम.जी.फावडे,अधिक्षक पी.एस.भोसले व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

close