प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी दि.31ऑक्टोबर2021 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या बारामती येथील संपर्क कार्यालयावर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे कृती समिती अध्यक्ष कॉ.नामदेव चव्हाण यांच्या नेतृतवाखालील मोर्चा काढणार असल्याची माहिती केजचे तालुका अध्यक्ष कॉ. मसु कांबळे यांनी दिली आहे.
ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ चे केज तालुका अध्यक्ष कॉ.मसु कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली दि.23 ऑक्टोबर2021 रोजी शासकीय विश्रागृह येथे बैठक पार पडली. ग्रामपंचायात यांच्या प्रलंबित विविध मागण्यासाठी व किमान वेतन ची अमलबजावणी करून कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वी कायम करून किमान वेतन प्रमाणे पगार देऊन 10 ऑगस्ट 2020 च्या शासन निर्णयानुसार ऑगस्ट 2020 पासून ची थकबाकी (इरियस) देण्यात यावी. यासाठी यापूर्वी वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. म्हणून ग्रामपंचयत कर्मचारी 31ऑक्टोबर 2021 रोजी उपमुख्यमंत्री यांच्या बारामती येथील संपर्क कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
तरी केज तालुक्यातून जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मोर्चास उपस्थित राहू असे आवाहन तालुका अध्यक्ष कॉ.मसु कांबळे आणि सचिव कॉ.कल्याण चाटे यांनी दिले आहे.तसेच बैठकीस उपस्थित कर्मचाऱ्यांचे आभार केज तालुका उपाध्यक्ष कॉ.हमीद शेख यांनी मानले. बैठकीस सर्व केज तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

