हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.११,उत्तरप्रदेश मधील लखीमपुर खिरी येथे न्याय मागणाऱ्या शेतकर्यांना गाडीखाली चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने दि.११ आँक्टोबर सोमवार रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.त्या बंदला सेनगाव शहरातील व्यापाऱ्यांनी आपला पाठींबा देत आपली प्रतिष्ठाणे बंद ठेवल्याने सेनगावात महाविकास आघाडीच्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळ्याचे चित्र होते.
उत्तरप्रदेश मधील लखीमपुर खिरी येथे न्याय मागणाऱ्या शेतकर्यांना गाडीखाली चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.त्या अनुषंगाने आज दि.११ आँक्टोबर सोमवार रोजी शहरातील छत्रपती शिवाजीराजे चौक(टि पाँईंट) येथे सकाळी साडेनऊ वाजता महाविकास आघाडीतील शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत उत्तरप्रदेश सरकार व केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत काही काळ रास्तारोको आदोंलन केले.कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापा-यांनी व इतर व्यापा-यांनी या बंदला पाठींबा देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवल्याने या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळ्याचे चित्र दिसत होते.यावेळी हिंगोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेशराव देशमुख,काँग्रेसचे उप जिल्हाध्यक्ष माजी जि.प.सदस्य ओमप्रकाश देशमुख,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाशराव देशमुख,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रविंद्र गडदे,राष्ट्रवादीचे नगरसेवक उमेश देशमुख,राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा वैशालीताई वाघ,शिवसेना तालुकाप्रमुख संतोष देवकर,युवासेना हिंगोली जिल्हा समन्वयक प्रविण महाजन,उप तालुकाप्रमुख पिंटू गुजर,युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष स्वप्निल देशमुख,अनिल अगस्ती,गंगाराम फटांगळे आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

