shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अ.भा.वि.प. संगमनेर कार्यकर्ता एकत्रीकरण कार्यक्रमाचे आयोजन..!!


अहमदनगर प्रतिनिधी : ( तुषार महाजन )

संगमनेर येथे दिनांक २५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संगमनेर शाखेने महासंपर्क अभियान राबविले होते. या संपर्क अभियानात अभाविप शी नवनवीन कार्यकर्ते जोडले गेले व त्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्याचे काम संगमनेर शाखेच्या कार्यकर्त्यांनी दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी केले. या कार्यकर्ता एकत्रीकरणाच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उत्तर नगर जिल्हा प्रमुख प्रा. अरुण लेले, जिल्हा संयोजक प्रतीक पावडे, व कार्यक्रम प्रमुख प्रीती नवले व पूर्व कार्यकर्ते वरद बागुल इ. उपस्थित होते. अभाविपचे जिल्हाप्रमुख प्रा.अरुण लेले सर यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेमकी काय काम करते व विद्यार्थी परिषदेची कार्यपद्धती काय आहे हे त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. 




त्याचसोबत वरद बागुल यांनी त्यांच्या कार्यकाळातील त्यांचा अनुभव सांगत सर्व कार्यकर्त्यांना संबोधित केले. तसेच अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचा समारोप अभाविप संगमनेरचे पूर्णवेळ कार्यकर्ते अभिषेक माने यांनी केला. या कार्यक्रमाला एकूण ५७ कार्यकर्ते उपस्थित होते. ३४ विद्यार्थी, २१ विद्यार्थिनी, १ प्राध्यापक, १ अन्य असे एकूण ५७ कार्यकर्ते उपस्थित होते.

close