shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त समाजसेवी व्यक्तींचा सत्कार..!!

राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी

काल रविवार दि.१०/१०/२०२१ रोजी नवरात्रौत्सव मंडळ, रांजणखार नाका यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त  समाजसेवी व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. अलिबाग तालुक्यातील असे मंडळ आहे  की जे सातत्याने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून नेहमी  समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असते. 


यावर्षी महाड येथील पुरामुळे  घाणीचे साम्राज्य पसरलेल्या परिसरातील स्वच्छता मोहीम व  पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू पुरवणे यासारखे कार्यक्रम राबविण्यात आले.


मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या  पहिल्या सत्कार सभारंभात(कोव्हीडमुळे शासनाचे नियम पाळून) सारळ येथील माजी सरपंच श्री.अमित नाईक, पेण येथील कृषी अधिकारी श्री. लाडगे साहेब व नारंगी येथील समाजसेवक श्री.अनिल बहाडकर यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच दरवर्षी मंडळाच्या शिवजयंती निमित्त  आयोजित केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबीर कार्यक्रमात सहभाग घेणा-या व उपस्थित असणा-या रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये श्री.जयवंत कृष्णा पाटील, श्री.राकेश गजानन म्हात्रे, श्री.गणेश मोहन म्हात्रे, श्री.अभय जनार्दन ठाकूर, श्री.राजेन्द्र मुरलीधर म्हात्रे,(सर्व रांजणखार) तसेच  श्री.हर्षल पाटील, भालचंद्र म्हात्रे(नारंगी) व श्री.आत्माराम पाटील, हिमसन टेलर्स, वाघ्रण यांचा सत्कार करण्यात आला.  

रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त केलेली सजावट व नेत्रदीपक विद्युत रोषणाई हे यावर्षीच्या कार्यक्रमाचे खास आकर्षक आहे. मंडळाच्या सर्व सभासदांचे अथक परिश्रमांमुळे हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडत आहे.

मंडळाची भविष्यात अशीच सामाजिक बांधिलकी जपत वाटचाल सुरू राहण्यासाठी सर्वाँनी शुभेच्छा दिल्या. 🙏🙏🌹🌹💐💐
close