श्रीरामपूर (प्रतिनिधी) :- येथील बाजारतळावरील प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगल कार्यालयात ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचा जिल्हा मेळावा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी शब्बीर अहमद अन्सारी होते तर मौलाना मिर्झा अब्दुल कयूम नदवी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमात नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अन्सारी व जिल्हाध्यक्ष हाजी फय्याज बागवान यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
या पदग्रहण समारंभात जिल्हा सल्लागार म्हणून ॲड. हारूण बागवान, दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष सादिक साबुद्दिन शेख - मुलानी (कर्जत), राहुरी तालुकाध्यक्ष उबेदूर रहमान बागवान, राहुरी तालुका उपाध्यक्ष नूर मोहम्मद आतार, तालुका कार्याध्यक्ष नवेद इक्बाल बागवान, श्रीरामपूर सहसचिव शब्बीर नंहे सहाब कुरेशी, तालुका सहसंघटक इसा आतार, तालुका सहसचिव सलिम आतार, श्रीरामपूर तालुका सहसचिव अफजल सुलेमान मंसुरी,तालुका खजिनदार अमीन नादर पिंजारी,तालुका सहसंघटक समीर इस्माईल पिंजारी, कर्जत तालुकाध्यक्ष सलिम लतिफ आतार,तालुका संघटक सोनू बागवान, राहाता तालुकाध्यक्ष शौकत हिराजी तांबोळी,तालुका उपाध्यक्ष इब्राहिम नवाब शहा,यांना पदग्रहण समारंभात नियुक्ती पत्र देण्यात आले, याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अन्सारी, मौलाना अब्दुल कयूम नदवी, श्रीरामपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करणदादा ससाणे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर,अॅड.हारुण यासीन बागवान, इब्राहिम युसूफ बागवान,नाशिक जिल्हाध्यक्ष तन्वीरखान तांबोळी, समाजवादी पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष रफीक सय्यद, शहराध्यक्ष इमरान चौधरी ,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमात संगमनेरचे माजी उपनगराध्यक्ष शफीभाई तांबोळी, माजी नगरसेवक शकील पेंटर, साबीर कुरेशी, समाजवादीचे राजू खान, शिरील अभंग ,इमरान मिर्झा,येवलाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अतीक गाजी, शहराध्यक्ष दादाभाई शेख, गरीब नवाज फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा श्रीरामपूर न.पा. नगरसेवक हाजी मुख्तारभाई शाह, बागवान समाजाचे अजिजभाई बागवान, प्रा. उमर बागवान (सर) साहित्यिक मीराबक्ष बागवान, छप्परबंद संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शाह, काकर समाजाचे शहराध्यक्ष इस्माईल काकर चौधरी , समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोयफ जमादार, मिल्लत सोसायटीचे अध्यक्ष सलाउद्दीनभाई शेख, हनीफ तांबोळी ,मुश्ताक तांबोळी,साबिर शहा, काँग्रेसचे तालुका सचिव जाफर शहा, जमील काकर, याकूबभाई कुरेशी, खाटीक समजाचे अध्यक्ष इलाहीबक्श कुरेशी, एमआयएमचे जिल्हा सहसचिव फय्याज कुरेशी, शहराध्यक्ष शहाबाज शेख, मुबीन हुसेन बागवान, आयाज हाजी रियाज बागवान,अमीन शाह, बिलाल शाह,अकबर पठाण, अत्तार समाजाचे इसाकभाई आतार, बीजेपी अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष साजिद शेख,रवी पंडित यांच्या समवेत इतरही सामाजाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हा उपाध्यक्ष व काकर समाजाचे प्रदेशाध्यक्ष इक्बाल काकर (सर) यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष हाजी फय्याज बागवान, जिल्हा उपाध्यक्ष इक्बाल काकर,जिल्हा सचिव इब्राहिम युसूफ बागवान, जिल्हा संघटक जाकीर उमर शाह,सहसचिव अजिजभाई आतार,अध्यक्ष आरिफ कुरेशी खाटीक,तालुका उपाध्यक्ष फय्याज मुलानी, कार्याध्यक्ष आरिफ काकर, तालुका सचिव तांबोळी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार नगरसेवक हाजी मुक्तारभाई शाह यांनी मानले.

