चिकनगुनिया व डेंगु च्या नियंत्रणासाठी त्वरीत औषध फवारणी करावी , इंदापुर शहर कॉग्रेस कमिटीची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी
इंदापुर प्रतिनिधी -
चिकनगुनिया व डेंगु च्या नियंत्रणासाठी त्वरीत औषध फवारणी करावी , इंदापुर शहर कॉग्रेस कमिटीची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी , कोरोना सारख्या महामारी मधुन शहर बाहेर पडत असताना डेग्यु व चिकणगुणिया सारख्या रोगराईने थैमान घातल्याचे चित्र शहरामध्ये दिसुन येत आहे .
शहरामध्ये अनेक डेंगू व चिकनगुनिया चे रूग्ण आढळून आले आहेत , तरी शहरामधील प्रभागनिहाय नगरपालिकेने औषध फवारणी त्वरित चालु करावी अशा आशयाचे पत्र इंदापुर शहर कॉग्रेस कमिटी चे शहराध्यक्ष चमनभाई बागवान यांच्या पत्राद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे(दिनांक २६ ऑक्टोबर २०२१) रोजी जी मागणी केले आहे .
या वेळी शहर अध्यक्ष चमनभाई बागवान, डॉ.संतोष होगले,जाकीरभाई काझी, , महादेव लोंढे, ,आकाश पवार, युवराज गायकवाड, नवनाथ गायकवाड उपस्थित होते.

