नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के )
( दि.२१)जिल्हा कृषी कार्यालय अहमदनगर विभागातील आत्मा या संस्थेच्या माध्यमातून कृषी विभाग अंतर्गत (दि.२१,२२)ऑक्टोबर रोजी बोस्को ग्रामीण विकास केंद्र केडगाव येथे कौशल्य आधारित काम करणाऱ्या शेतमजुरांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या अंतर्गत ठिबक सिंचन देखबाल व दुरुस्ती या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले,
यावेळी सदर प्रशिक्षणास आत्माचे प्रकल्प उपसंचालक आर के गायकवाड तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले अवनी ऍग्रो चे श्रीकांत आघाव आत्मा नगर तालुक्याचे एसपी जावळे,उमेश डोईफोडे व तालुक्यातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणारे शेतकरी रामदास चितळक, अनिल पवार, आदी शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रम उपस्थित शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
दीपक जायभाय जिल्हा व्यवस्थापक स्किपर मेटझर, आप्पासाहेब शेजुळ तसेच एप्रास इरिगेशन चे संकेत बटुळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या अनमोल प्रशिक्षण मिळाल्याने शेतकरयांना आत्मा कृषी अधिकारी यांचे आभार मानले.

