श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर नगर पालिकेकडून पुणे येथील डोंबाळे यांच्या दिशा एजन्सीला शहरातील घाण-कचऱ्याचा ठेका देण्यात आलेला आहे,त्यास नगर पालिकेकडून दर महिन्याला ३० लाख रुपये देऊनही शहरातील घाण-कचरा रोजच्या रोज व्यवस्थित साफ होत नसल्याने या घाण-कचऱ्यामुळे डासांचा प्रचंड प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून शहरात संभाव्य डेंग्यू, मलेरिया, टायफाईड,फ्ल्यू,चिकनगुनिया अशा स्वरुपाच्या साथीच्या आजाराची साथ फैलाऊ पहात आहे,याविषयी नगर पालिकेला वेळोवेळी निवेदने,विनंती अर्ज देऊनही नगर पालिकेकडून संबंधित ठेकेदारास समज देत त्यावर उचित कारवाई करण्याऐवजी उलट त्याची पाठराखण केली जात आहे,
शहरातील नागरीकांना संभाव्य रोगराईच्या खाईत ढकलु पाहणाऱ्या संबंधित घाण-कचरा ठेकेदाराचा ठेकाच रद्द करण्यात येऊन दुसऱ्या कोणास देण्यात यावा,यामुळे शहरवासियांचे आरोग्य अबाधित राहील या आशयाच्या विविध ज्वलंत नागरी समस्यांच्या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोयफ जमादार यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी पासून नगर पालिकेसमोर आमरण उपोषण सुरु केले होते,या उपोषणाला चार दिवस उलटून गेले तरी संबंधित नगर पालिका प्रशासनाकडून कुठलीच कार्यवाही होताना दिसून येत नव्हती,मात्र सदरील उपोषणास विविध पक्ष, सामाजिक संघटनांचा पाठिंबा वाढत असल्याने उपोषणाच्या पाचव्या दिवशी सोमवार दिनांक ०४/१०/२०२१ रोजी सकाळी १०: ३० वाजता संविधान बचाव समीती,श्रीरामपूर (आणि इतर- कॉंगेस पक्ष,आम आदमी पार्टी,वंचित बहुजन आघाडी, भीम गर्जना सामाजिक संघटना,भारतीय लहुजी सेना, आरपीआय अशा राजकीय पक्ष तथा सामाजिक संघटनांचा पाठिंबा लाभल्याने) नगर पालिकेस टाळे ठोको आणि रस्ता रोको आंदोलन करण्याचा संविधान बचाव समितीच्यावतीने इशारा देण्यात आला होता, सकाळ पासूनच नगर पालिके समोर कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागल्याने संबंधित नगर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले, त्यांनी उपोषणकर्ते जोयफ जमादार यांना उपोषण सोडण्याची विनंती केल्यानुसार श्री.जमादार यांनी त्यांच्यापूढे काही मागण्या ठेवल्या त्या पुढील प्रमाणे - १) निवेदेतील शर्ती व अटींप्रमाणे संबंधित ठेकेदाराने काम न केल्यामुळे त्यास पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा,२) संबंधित ठेकेदाराचा ठेका त्वरित रद्द करण्यात यावा,३) नियमांप्रमाणे ठेका रद्द न झाल्यास त्याला तीन महिन्यांची अंतिम मुदत नोटीस देऊन तीन महिन्यानंतर त्याचा ठेका रद्द करण्यात यावा,४) कामात कसूर केल्याबद्दल ठेकेदारास आकारण्यात येणारा दंड दोन दिवसात वसूल करण्यात येऊन दंड पावतीची छायांकित प्रत उपोषणकर्त्यास देण्यात यावी,५) उपोषण सोडल्यानंतर जर पुन्हा ठेकेदाराने शहरात घाणीचे साम्राज्य पसरविले (म्हणजे व्यवस्थित साफसफाई केली नाही तर) व निवेदेतील शर्ती व अटींचा भंग केला तर पुन्हा मोठ्या प्रमाणात मोठ्या स्वरुपाचे उपोषण,रस्तारोको आंदोलन,गेट बंद आंदोलन करण्यात येईल,६) संबंधित ठेकेदाराने शहरातील साफसफाईची कामे करत असताना कामगारं संख्या वाढी सोबतच घंटागाडी तसेच इतर कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढवावी तरच आज उपोषण स्थगित करण्यात येईल असे आपल्या मागणीपत्रात म्हटले होते,त्यावर श्रीरामपूर नगर पालिका मुख्याधिकारी यांच्याकडून उपोषणकर्ते श्री.जमादार यांच्या अटी व शर्ती मान्य करत उपोषण सोडणेकामी पत्र देण्यात आले ते पुढील प्रमाणे- संबंधित ठेकेदारास इकडील कार्यालयात प्राप्त तक्रारीनुसार आपण पाच लाख दंडाची मागणी केल्याप्रमाणे प्रत्यक्ष पाहणी करुन विहित मुदतीत निवारण न झालेल्या तक्रारीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल,२) सदर ठेकेदाराची तीन महिन्यांमध्ये कामांमध्ये सुधारणा करण्याबाबत अंतिम नोटीस बजावण्यात येईल,३) ठेकेदारास अदा करणेत येणाऱ्या मासिक बिलातून कपात करणेत आलेली दंडाची रक्कमेची छायांकित प्रत बिल अदा केल्यानंतर ७ दिवसांत उपोषणकर्त्यास देण्यात येईल, तरी आपण नगर पालिकेसमोर करत असलेले उपोषण थांबवावे, असे नगर पालिका प्रशासनाच्यावतीने उपोषणकर्ते जोयफ जमादार यांना पत्र देण्यात आल्याने आज पाचव्या दिवशी त्यांचे उपोषण सुटले आहे,मात्र संबंधित ठेकेदाराने पुन्हा कामचुकारपणा केल्यास आणि शहरात घाणीचे साम्राज्य पसरवले तथा उपोषणकाळात दिलेले शब्द आणि लेखीपत्राचा भंग केला गेला तर, पुन्हा यापेक्षाही उग्र स्वरूपाचे उपोषण आणि आंदोलन छेडले जाईल सदरील उपोषण आपण आज दिनांक ०४/१०/२०२१ रोजी तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करत असल्याचेही यावेळी जोएफ जमादार म्हणाले, यावेळी अहमदभाई जहागीरदार, उपनगराध्यक्ष करण ससाणे, नगरसेवक संजय फंड,नागेश भाई सावंत,अनिल कांबळे,तिलक डूंगरवाल, संजय छल्लारे, श्रीनिवास बिहाणी,अनंत पटेकर,शौकतभाई शेख,दिलीप नागरे,मुन्ना पठाण,आदील मखदूमी, रियाजखान पठाण, चरण त्रिभवन, शाहिद कुरैशी, फिरोज पठाण,हुजैफ जमादार, तौफीक शेख, हानिफ पठाण, जाविद कुरैशी,आसिफ तांबोळी, अय्यूब पठाण,अभिषेक सोनवणे, एजाज दारूवाला,अरबाज कुरैशी,ज़करिया सैय्यद,इमरान शेख, मुबसशिर पठाण,अनवर तांबोळी,फैज़ान सैय्यद,अमन इनामदार,नदीम तांबोळी, जाविद तांबोळी,सादिक शाह,साद पठाण, गुफरान सैय्यद,अदनान कुरैशी, रिजवान बागवान, मकसूद मिर्जा,जहीर जमादार, कय्यूम पठाण,जावेद कुरेशी, गुड्डू जमादार,अल्तमश शेख, जुबेर शाह, अफज़ल शाह,रेहान शेख,अरबाज़ बेग,नदीम तांबोळी, शहेजाद शेख,राझीक शेख, जीशान सैय्यद,शकील शेख, सोहेल शेख,अय्युब जमादार, अरबाज़ देशमुख, बूंदी कुरैशी, मोसिन शाह,जफर कुरैशी,ज़ैद जमादार,समीर शेख,आरिफ बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
उपोषण यशस्वी करण्यासाठी समाजवादी पार्टी आणि जे.जे.फाऊंडेशन कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
श्री.जमादार यांच्या नागरी समस्या प्रश्नी श्रीरामपूर शहरातील अस्वच्छेचा प्रश्न राज्य आणि केंद्र शासनाकडे पोहोचला आहे, समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी जोयफ जमादार यांच्या उपोषणाची दखल घेऊन केंद्र सरकाशी चर्चा करणार असल्याचे तथा समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आबु असिम आझमी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मा.मंत्री शकिल अहमद यांनी उपोषणकर्ते जोयफ जमादार यांना फोन करुन सांगत नागरी समस्येप्रश्नी लढण्याचे बळ दिले,
श्रीरामपूर शहराच्या इतिहासात प्रथमच सलग पाच दिवस उपोषण केल्याने समस्त शहरवासियांच्या आरोग्यप्रश्नी लढणाऱ्या लढवय्या जोयफ जमादार यांची शहरात देखील विक्रमी लोकप्रियता वाढली असल्याचे दिसून येत आहे.

