तेरावे आयपीएल सत्र आजपर्यंतच्या इतर सर्व आयपीएल स्पर्धांपेक्षा जरा जास्तच रोमहर्षक ठरले आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा गुणतालिकेत फारच उलटा पालट झाली असून गतविजेता मुंबई इंडियन्स व मागच्या वर्षी क्वॉलीफायर सामना खेळणारा सनरायझर्स हैद्राबाद संघ यावेळी तळाला म्हणजे सातव्या व आठव्या क्रमांकावर आहेत. तसे बघाल तर या दोन संघांचे दोन दोन सामने बाकी असून यातील मुंबई इंडियन्सने जर दोन्ही सामने सरस धावगतीसह जिंकले तर मुंबई प्ले ऑफ मध्ये खेळणारा चौथा संघ बनू शकतो.
तर सनरायझर्स हैद्राबादला मात्र तशी संधी उपलब्ध नाही. कारण त्यांनी खेळलेल्या बारापैकी १० सामने गमावल्याने त्यांनी उर्वरीत दोन्ही सामने जरी जिंकले तरी त्यांची गुणसंख्या आठ इतकीच मर्यादित राहील व इतर सर्व संघ त्यांच्यावरच असतील. हैद्राबाद जिंकल्यास फरक इतकाच राहील की त्यांच्या विजयाने इतर संघाच्या आशांवर पाणी फिरेल.
हा लेख लिहीला जात असे पर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स २० गुणांसह पहिल्या, चेन्नई सुपर किंग्ज १८ गुणांसह दुसऱ्या, रॉयल चॅलेंजर्स १४ तर कोलकाता नाईट रायडर्स १२ गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत. यातील दिल्ली, चेन्नई व बंगलोरचे प्ले ऑफ स्थान निश्चित झाले असून उर्वरीत सामन्यातील त्यांचे जय पराजय गुणतालिकेतील त्यांचे क्रम बदलू शकतात हे मात्र नक्की !
पंजाब, राजस्थान व मुंबई यांचे १० गुण असून त्यांचे प्रत्येकी दोन सामने बाकी आहेत. त्या सामन्यातील त्यांचे सरस धावगतीचे विजय त्यांचे प्ले ऑफचे स्वप्न साकार करू शकते. परंतु या सर्व संघाचा विचार केला तर केकेआर तेरा सामन्यात १२ गुण मिळवून चौथ्या स्थानावर आहे व त्यांचा एक सामना राजस्थान रॉयल्स बरोबर बाकी आहे. त्यांना या सामन्यातील साधा विजयही प्ले ऑफ मध्ये नेण्यास पुरेसा ठरू शकतो. कारण त्यांची धावगती +०.२९४ इतकी असून पंजाब, मुंबई, व राजस्थानची धावगती उणे असून केकेआरला हिच बाब या तीन संघांच्या तुलनेत प्ले ऑफ मध्ये जाण्यास प्राधान्य देत आहे.
केकेआरचे नाशिब जर जोरावर असले तर ते राजस्थान बरोबरचा सामना हारले तरी ते प्ले ऑफमध्ये जाऊ शकतात. पण यात जर तरची फार मोठी गुंतागुंत असून शब्दशः नशिबच त्यांना तिथपर्यंत घेऊन जाऊ शकते.
राजस्थान बरोबरचा सामना केकेआर जिंकले तर त्यांचा प्लेऑफचा रस्ता सुकर होणारच, परंतु राजस्थानबरोबर केकेआरचा पराभव झाला तरीही मॉर्गनच्या संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळू शकते त्यासाठी पंजाब आपला शेवटचा सामना हारले पाहिजे. तसेच मुंबईने राजस्थानला हरवून हैद्राबाद बरोबरचा सामना हरायला हवे. तरच केकेआर प्ले ऑफ मध्ये आपल्याला दिसेल.
कोलकाता नाईट रायडर्सचं नशिब सध्या जरी आपल्याला जोरावर दिसत असलं तरी प्रत्यक्षात त्यांना या स्पर्धेत अनेक खडतर प्रसंगांना तोंड द्यावे लागले असून भारतात झालेल्या पहिल्या टप्प्यातील ७ पैकी ५ सामने त्यांनी गमावले तर युएईत गेल्यानंतर त्यांचे नशिब अपेक्षेपेक्षा जरा जास्तच फळफळले. युएईतील ६ पैकी चार सामने त्यांनी सहज जिंकले तर चेन्नई विरूध्द शेवटच्या चेंडूवर पराभूत झाले होते. नवा डावखुरा सलामीवीर व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी व वरुण चक्रवर्ती यांची नेत्रदिपक कामगिरी केकेआरचं भाग्य बदलून गेली. शिवाय सुनिल नारायण, दिनेश कार्तिक व नितेश राणा यांचीही संघाला वेळोवळी मदत झाली आहे. परंतु कर्णधार ओएन मॉर्गन साफ निष्प्रभ ठरला आहे तर हुकमी एक्का आंद्रे रसेल दुखापतीने संघाबाहेर आहे. तरी उपलब्ध खेळाडू आपले कर्तव्य ईमानेइतबारे पार पाडत असल्याने केकेआर प्ले ऑफ च्या उंबरठ्यावर उभे आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

