shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यातील शेती वीज तोडणी मोहीम त्वरित थांबवून पूर्ववत विज सेवा सुरू - नामदार भरणे यांच्या प्रयत्नाला यश.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विनंतीस मान देऊन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी इंदापूर तालुक्यातील शेतकरी वीज खंडित न करता ती पूर्ववत ठेवण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना केली सूचना.

इंदापूर तालुक्यातील शेती वीज तोडणी मोहीम त्वरित थांबवून पूर्ववत विज सेवा सुरू - नामदार भरणे यांच्या प्रयत्नाला यश.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विनंतीस मान देऊन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी इंदापूर तालुक्यातील शेतकरी वीज खंडित न करता ती पूर्ववत ठेवण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना केली सूचना.


इंदापूर प्रतिनिधी:

अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विहित मुदतीत वीज देयके भरणा करता आली नाहीत. आता ऊस गळीत हंगाम सुरू होणार असून त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नामधून शेतकऱ्यांना वीजदेयके भरणा करता येतील. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पुर्वरत करून वीजदेयके टप्प्याटप्प्याने भरण्याकरीता सवलत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. 

या मागणीच्या अनुषंगाने ऊर्जामंत्री नामदार  नितिन राऊत यांची मंत्रालयात भेट घेऊन इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा खंडीत वीजपुरवठा पुर्वरत करून त्यांना थकीत वीजदेयके टप्प्याटप्प्याने भरण्याकरीता सवलत देण्यात यावी अशी विनंती केली.
 

नामदार  दत्तात्रय  भरणे यांच्या विनंतीचा आदर करत ऊर्जामंत्री नामदार  नितिन राऊत यांनी इंदापूर तालुक्यातील संबंधित विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकरी वीज खंडीत न करता ती पूर्ववत ठेवावी या संदर्भात सूचना दिल्या.
close