-------------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यातील दलित चवळीतील एक जेष्ठ कार्यकर्ते गंगाधर सिरसट वय (५७ वर्ष) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
या बाबतची माहिती अशी की, दलित चळवळीतील जेष्ठ नेते आणि भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजनचे आघाडीचे जेष्ठ नेते गंगाधर सिरसट वय (५७ वर्ष)हे तात्या म्हणून ओळखले जात होते. त्यांनी दूरसंचार विभागाच्या जिल्हा समितीवर सदस्य पद भूषविले होते. त्यांनी मिलिंद कॉलेज मधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठातून पदवी मिळविली प्राप्त केली होती. तसेच त्यांनी शिक्षण शास्त्रातील बी एड चे शिक्षण केलेले होते; मात्र त्यांनी नौकरी न करता दलित चळवळीत झोकून दिले. कुटुंबाच्या उपजीवेसाठी ते तहसील कार्यालयातील विविध प्रमाणपत्रे काढणे. तसेच उपनिबंधक कार्यालय अंतर्गत चालणारे जमीन व प्लॉटच्या खरेदी-विक्रीच्या नोंदणी व्यावहाराचे देखील काम करीत होते.
दरम्यान दि. २८ ऑक्टोबर गुरुवार रोजी गंगाधर सिरसट हे सकाळी घरातून निघून तहसील कार्यालयाकडे जात असताना ते रस्त्यावर येताच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार असून ते चळवळीतील अभ्यासू कार्यरकर्ते होते त्यांच्या निधना बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध व्यक्तींनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

