shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'त्या' मयताची ओळख पटविल्या बद्दल डी बी पथकाचे दिलीप गित्ते यांचे पोलीस अधीक्षकांनी केले अभिनंदन..!!

--------------------------------------------------------------------

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

लातूर येथील विलासराव देशमुख सर्वोपचार रुग्णालयात या सरकारी दवाखान्यात दि. २५ ऑक्टोबर रोजी मयत झालेल्या गजानन श्रीरंग बनसोडे याची इंटरनेट च्या माध्यमातून ओळख पटविल्या बद्दल केज पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाचे दिलीप गित्ते यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा यांनी अभिनंदन करीत कौतुक केले आहे.



या बाबतची माहिती अशी की, गांधी चौक, लातूर येथील एम.एल.सी. नोंद नं. १२१ दि .२५ ऑक्टोबर २०२१ मधील मयत इसम नामे गजानन श्रीरंग बनसोडे वय ३५ वर्ष हा दि. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी ९ :३३ वा. लातूर येथील विलासराव देशमुख सर्वोपचार रुग्णालय या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी लातूर येथे भरती झाला होता. त्याचा दि .२५ ऑक्टोबर २०२१ रोजी सरकारी दवाखाना लातूर येथे उपचारा दरम्यान सकाळी ११:२० वा. मृत्यू झाला. तो मयत झाल्याने एमएलसी पत्रक प्राप्त झाल्याने पोलीस स्टेशला नोंद घेवुन पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांनी मयताचे नातेवाईकांचा शोध घेतला असता मयताचा नेमका व सविस्तर पत्ता उपलब्ध नसल्याने नातेवाईकांशी संपर्क झालेला नव्हता.

त्यामुळे पोलिसांनी प्रसिद्दी माध्यमातून त्याची माहिती प्रसिद्ध करून मयताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान केज पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाचे दिलीप गित्ते यांनी प्रसिद्धी माध्यम, सोशल मीडिया व इंटरनेटची मदत घेऊन अखेर मयताची ओळख पटविण्यात यश मिळवले. सदर मयत व्यक्ती हा परभणी जिल्ह्यातील पेठ पिंपळगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले. या तपासा बद्दल जिल्हा पोलीस अधिक्षक आर राजा यांनी शोध पथकातील दिलीप गित्ते यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

close