shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल न्यायालयाच्या गोवंश तस्करांना दणका, खावटीपोटी ५ गोवंशांना प्रती गोवंश ५० रुपये प्रती दिन देण्याचे आदेश....

एरंडोल प्रतिनिधी


एरंडोल खावटीपोटी पाचही गोवंशांना प्रती गोवंश ५० रुपये प्रतीदिन समर्पण गोशाळा(भालगाव ) यांना देण्याचा आदेश एरंडोल न्यायालयाने दिला.
या ऐतिहासिक निर्णयानंतर प्राणी मित्रांनी व बजरंग दलाने आनंद व्यक्त केला असून गोवंश तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , दि.३१/८/२१ रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास एरंडोल म्हसावद रोड वरील मरीमाता चौक येथे विना परवाना ५ गोवंश जीवंत स्थितीत दोराच्या साहाय्याने कत्तलीसाठी नेण्याच्या उद्देशाने कोणतीही काळजी न घेता दाटीवाटीने कोंबून भरलेल्या स्थितीत मिळून आल्याने गोवंश प्रेमी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सदरील गोवंश पोलिसांच्या मदतीने जप्त करून पुढील संगोपनासाठी समर्पण गोशाळेत पाठविले सदरील कारवाई कामी प्रसाद दंडवते, विवेक ठाकूर,प्रकाश पाटील, विक्रांत ठाकूर, मुकेश भोई, सागर मराठे, शंतनू भेलसेकर,सागर महाजन व विहींप बजरंग दल एरंडोल तालुका कार्यकारणी यांनी कर्तव्यदक्ष नागरिकाची भूमिका चोख बजावली..दरम्यान आरोपी शेख लुकमान शेख मुसा ,स्नेह नगर औरंगाबाद यानी गोवंश परत मिळणेसाठी अर्ज कोर्टात दाखल केला व गोवंशांचा ताबा मागितला त्यानंतर समर्पण गोशाळा तर्फे रामकृष्ण पाटील यांनी ५ ही गुरांसाठी तीनशे रुपये प्रतिदिन खावटी मिळावी अशी मागणी केली.
मा. न्यायदंडाधिकारी यांनी दोनही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत समर्पण गोशाळेची खावटी मिळण्याची मागणी मान्य करीत पालनपोषण खर्चापोटी प्रतिदिन प्रती गोवंश( गो शाळेत दाखल झाल्या दिवसापासून) रक्कम रु ५० देण्याचे व सदरचे पैसे तात्काळ जमा करण्याचे आदेश एरंडोल न्यायालयाने आरोपींना दिले. दरम्यान समर्पण गोशाळा भालगाव यांच्या वतीने विधिज्ञ अजिंक्य ए काळे व सरकारी वकील ऍड वळवी यांनी कामकाज पाहिले त्यांना ऍड आल्हाद एम काळे व एड राहुल एस पारेख(धरणगाव) यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले ..व ऍड आकाश महाजन व ऍड नीरज जगताप यांनी सहकार्य केले.तर आरोपी/ अर्जदार यांच्यातर्फे ऍड शकिलोद्दीन काझी यांनी काम पाहिले.

close