औरंगाबाद । सतिश लोखंडे ( प्रतिनिधी ) :- आज सुध्दा भारतामध्ये बर्याच महीलांना नोकऱ्या नाहीत. उद्योग धंदे नाहीत उद्योग उभा करण्यासाठी पैसा नाही. आज घडीला बऱ्याच समस्या ला सामोरे जावे लागत आहे.
त्याच उद्देशाने आरंभ प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष संजय जी टाक यांनी महीला सक्षमिकरण करण्यावर भर देण्याचा निश्चय पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.महीलांना उद्योग कसा उभा करता व शिलाई मशीन, अंगणवाडी सेविका , ब्युटी पार्लर असे अनेक प्रशिक्षण देण्यात येत आहे. व त्यासाठी . मार्गदर्शन मेळावे व शिबिर घेण्यात येत आहे.
वाडा येथे महीला साठी लघुउद्योग कारखाना चालू करण्यात येत आहे.दि.१९/२०/२५/२७ या तारखेप्रमाणे दिलेल्या जिल्ह्यामध्ये गोरगरीब व गरजू सामान्य कुटुंबासाठी मोफत आरंभ प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याची ॲम्ब्युलन्स सेवा सुरुवात होत असून पहिले उदघाटन लातुर जिल्हयातून होत आहे.
शहापूर मध्ये पॅथॉलॉजी लॅब चालू करीत आहे आरंभ प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य समाजकार्य हे अतिशय वेग वेगळ्या विभागांमध्ये गोरगरीब जनतेचे अनेक प्रश्न सातत्याने मार्गी लावण्यासाठी काम राज्य तील सर्व पदाधिकारी परकष्टाने काम करीत आहे. व त्यावर कोअर कमिटीचे व अध्यक्ष महोदय चे सातत्याने बारकाईने लक्ष ठेवून असते.आणि यापुढे सुध्दा आरंभ प्रतिष्ठान अनेक क्षेत्रात अग्रेसर राहणार यात शंका नाही.

