जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाॅटसॲप - ९७६८४२५७५७
मुंबई: अंधेरी पश्चिम वार्ड क्रमांक ६७ डी एन नगर रोड शीतल को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग क्रमांक २३ समोरील रस्ता गेल्या एक वर्षभरापासून खोदून ठेवण्यात आलेला असल्याने खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत. हेच तेथील स्थानिकांना समजायला तयार नाही ?
पूर्ण पावसाळ्यामध्ये ही हीच परिस्थिती होती तेथून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना जाण्याचा मार्गच सापडत नव्हता. इतक्या भयंकर परिस्थितीचा सामना वयोवृद्ध नागरिक,लहान मुले, माता-भगिनीने कसा केला असेल याची आपण कल्पनाही करू शकणार नाही ? कित्येक रहिवाशांना जाता-येता व दुचाकीस्वार यांना खड्ड्यात पडून मोठ्या प्रमाणात दुखापती झालेल्या आहेत. पण आपल्या व्यथा मांडणार कोणाकडे ? लोकप्रतिनिधींचा लक्ष नाही ? फक्त राजकारण..राजकारण..!
महानगर पालिका अधिकाऱ्यांना काही पडलेले नाही ?
अशा प्रकारे दुर्लक्ष करून सर्वसामान्यांच्या जिवाचा मांडण्यात आलेला खेळ अपघात जिवित हानी होण्याअगोदरच जातीने लक्ष घालून ज्या त्रुटी असतील त्या दूर करून वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, माता-भगिनी यांचा विचार करून
तत्कालन खड्डेमय झालेला रस्ता बनवून देण्यात यावा. अशी मागणी महाराष्ट्र क्रांती संघटना प्रमुख पी बी कोकरे यांनी लेखी निवेदनाद्वारे सहाय्यक आयुक्त के पश्चिम विभाग महानगरपालिका अंधेरी पश्चिम यांच्याकडे केली असून सदर माहितीकरिता निवेदन प्रति मा.सौ किशोरीताई पेडणेकर - महापौर मुंबई व मा.श्री इक्बाल सिंह चहल - आयुक्त बृहनमुंबई महानगरपालिका मुंबई यांस पाठविण्यात आलेल्या आहेत तरी आता अपेक्षा योग्य कार्यवाहीची.

