shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कमलेश किशोर जाधव,अमोल कोते,चंद्रभान पवार यांच्या युवक काँग्रेसमध्ये निवडी जाहीर झाल्यामुळे करण्यात आला सन्मान..!!

शिर्डी । प्रतिनिधी :-
शिर्डी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. अमृत गायके यांच्या मार्गदर्शनाखाली,आज कमलेश किशोर  जाधव यांची शिर्डी शहर युवकाच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली तसेच नियुक्ती पत्र देण्यात आले.

अमोल कोते यांची शिर्डी शहर युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी तर चंद्रभान पवार यांची युवक काँग्रेसच्या  उपाध्यक्षपदी काही दिवसांपूर्वी निवड करण्यात आली होती. त्यानिमित्त त्यांचा आज हॉटेल साई स्मरण या ठिकाणी सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


यावेळी उपस्थित प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रसाद भाऊ शेळके, युवक उपाध्यक्ष संतोष वाघमारे,युवा उपाध्यक्ष दिपक पवळे,सचिव कृष्णा गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
close