shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हेमंत मुसरीफ यांच्या छान कविता..!!


कुष्मांडीमा ..

जगन्माता कुष्मांडी
ओवलीचवथी माळ
तूचं  निर्मीले ब्रह्मांड
नमनकरे तुज काळ
जन्म जरा अन् मृत्यू
सगळे  तुझेचि  खेळ
तुझेच गुलाम गं माते
रात्र दिस  काळ वेळ

नर नारी निर्मी दोन्ही
गुंफत उचीत गं मेळ
स्त्रीला जनन्  शक्ती
गं तीचं निर्मिते फळ

अबला न सबलाकेले
देऊन विशेष  हे बळ
कळले  ना  आम्हांस
समजे  महिला दुर्बळ

विनंती आई  तुजला
मने  करी  गे  निर्मळ
विसरावे  भेदभाव हे
सुखी समृद्ध  सकळ

- हेमंत मुसरीफ पुणे.
  ९७३०३०६९९६.
  www.kavyakusum.com

2)

जगजननी ..

जगजननी कुष्मांडी
ओवली चवथी माळ
तूचं  निर्मीले ब्रह्मांड
नमन करे तुज काळ

जनाऊ बनली माती
घुसला कृपेचा फाळ
अंकुरले  बीज  गोड
धारा बरसे आभाळ

माय लेकराची छान
जडवी घडवी  नाळ
फुले  गुंफता  दोरात
बनली  सुरेख  माळ

नरनारी हा भेदाभेद
पाप  आमचे वंगाळ
स्त्रि अवमानीत करे
चालले उगा गु-हाळ

महिला दुर्बला  मानी
करी  सदैव आबाळ
तोल  घसरे  वारंवार
जननी  तुचं सांभाळ

- हेमंत मुसरीफ पुणे.
  ९७३०३०६९९६.
  www.kavyakusum.com

3)

चवथी माळ ..

चवथी माळ जपता 
आगळी येते स्फुर्ती
स्मित हास्य  करता
करे ब्रह्मांड निर्मीती

सर्वांत तेजस्वी  रुप
त्रिखंडा तिची किर्ती
सिंहा रुढ महामाया
सूर्य मंडळात वसती

अष्ट भुजा  आदिती
आयुधे  शोभे  हाती
मुखकमल ओजस्वी
उजळे सहस्त्रज्योती

प्रिय  तिज कोव्हळा
भक्तांवर अति प्रिती
साधक मन  मग्न हो
अनाहत चक्र स्थिती

आईचा  जयघोष हो
अचंचल  मन आरती
जगदंबा   शरणागती
मनी जागृत  आकृती

- हेमंत मुसरीफ पुणे.
  ९७३०३०६९९६.
  www.kavyakusum.com

4)
केशरी ..
(चतुर्थ दिन )

नवरात्रीचे नऊ रंग
रंग आजचा केशरी
केशरीश्रीखंड दिसे
गोड गोड दारी घरी

दिसतेस गोड छान
केशरी रंगाची  परी
कौतुकाचे शब्ददोन
बदलले रंग परोपरी

आपणासाठी त्याग
बायका किती करी
काहीनं काही काम
सोपवले तिचे करी

शब्ददोन बोल जरी
खुशी वाटते अंतरी
अपेक्षा न अतिमनी
जबाबदारी पेलेतरी

मनाचे  सौंदर्य  मोठे
वस्त्र जसे  भर जरी
दुःख दर्द  जाई  दुरी
देईलं  तुरी हातावरी

- हेमंत  मुसरीफ, पुणे
  9730306996.
  www.kavyakusum.com
close