शिरूर :- दिनांक: 01/10/2021 शिरूर, पुणे. आज शुक्रवार रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या कडून आरोही कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स ला सकाळी 6.30 वा.सदिच्छा भेट देण्यात आली तसेच कॉलेज च्या शेजारी असलेल्या जलसा हॉटेल चे उदघाट्न अजितदादा यांच्या हस्ते करण्यात आले.
तदनंतर दादांनी शिरूर नगरपरिषदच्या नूतन इमारतीचे उदघाट्न केले. सदर प्रसंगी दादा म्हणाले कि शिरूर च्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही व लवकरच शिरूर चा विकास करून शिरूर चे पुणे करण्यात येईल असे आपल्या भाषणात सांगितले.
प्रसंगी श्री शशस्वामी समर्थ फौंडेशन चे अध्यक्ष डॉ. प्रविण चोळके यानी अजितदादा पवार , खाजदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक बाप्पु पवार, मार्गदर्शक पोपटराव गावडे व सर्व मान्यवरांचे आभार मानले.

