लोहा । प्रतिनिधी :-
नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या वतीने लोहा शहरांच्या परंपरेनुसार खारिक खोबऱ्याचा हार घालून सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी खारीक खोबर्याच्या हारा विषयी उत्सुकतेने माहिती घेतली यावेळी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी त्यांना सांगितले की लोह्याचे पाहीले नगरआध्यक्ष कै मानीकराव पवार पाटील यांनी ही सुरवात केली जिल्ह्यात कींवा लोह्याला कोणी नविन अधिकारी आले कींवा राजकीय नेते मंडळी आली की त्यांचा सत्कार मानिकराव पाटील हे खारीक खोबर्याचा हार घालून करायचे तेव्हा पासून ही परंपरा सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यात अनेक लोकाभिमुख कार्य केले. कोरोना व लाॅकडाऊन काळात उल्लेखनीय कार्य केले.तसेच शासकीय योजनाची प्रभावी अंमलबजावणी केली. त्यांच्या हातून नांदेड जिल्ह्याचा दिवसेंदिवस विकास होवो त्यांना बळ मिळो म्हणुन नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या वतीने कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांचा खारिक खोबऱ्याचा हार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक अमोल व्यवहारे, पत्रकार बाळासाहेब कतुरे, गुलाम शेख आदी उपस्थित होते.

