उपकेंद्र तक्रारवाडी अंतर्गत मदनवाडी येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा.
मदनवाडी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी अनोखा उपक्रम
ज्येष्ठांकडून आरोग्य विभागाचे होत आहे कौतुक.
इंदापूर प्रतिनिधी: (१ ऑक्टोबर २०२१)उपकेंद्र तक्रारवाडी अंतर्गत मदनवाडी येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन दि.१ ऑक्टोबर २०२१ रोजी साजरा करण्यात आला.
यावेळी उच्च रक्तदाब, रक्तातील साखर, मुखरोग इत्यादी तपासणी करण्यात आली. ८६ ज्येष्ठ नागरिकांना लाभ
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मृदुला नितीन जगताप यांनी वृद्धत्व ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. जागतिक स्तरावर वृद्ध व्यक्तींचे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे .शारीरिक वृद्धत्व प्रक्रियेच्या परिणामी शारीरिक सामर्थ्य तसेच प्रतिकारशक्तीमध्ये घट होते. शारीरिक क्षमतेमध्ये झालेली घट आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे वृद्धांना विशेष आरोग्य निगा सुविधांची गरज असते .वृद्धांमधील उच्चरक्तदाब,मधुमेह, हृदयरोग, पक्षाघात ,श्वसनाचे आजार उदासीनता यांसारखे विविध आजार जडतात यासाठी काय करावे काय करू नये याबद्दल मार्गदर्शन केले.
तसेच दररोज पोस्टीक आहार घ्यावा दररोज योगा करावा नियमित वैद्यकीय तपासणी करावी, डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्यावी, वेदना कडे दुर्लक्ष करू नये तज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये तंबाखू धूम्रपान मध्यपान सेवन इत्यादी करू नये . असे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी-डॉ. मृदुला जगताप
आरोग्य सहाय्यक- ओंबासे
आरोग्य सेविका- श्रीमती भोस सिस्टर
अशा- मनीषा देवकाते, सविता देवकाते व इतर गावातील ग्रामस्थ होते.
चौकट:
*ज्येष्ठ नागरिकांसाठी अवहान.*
_नैराश्य वाटल्यास ई संजीवनी ओपीडी मध्ये रजिस्ट्रेशन करून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसेच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र याठिकाणी टेलीमेडिसीन द्वारे मार्गदर्शन घ्यावे,१०४ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आरोग्य अधिकारी-डॉ. मृदुला जगताप यांनी आवाहन केले._

