बांधावरून भावाभावात भांडण्यापेक्षा सकारात्मक विचाराने वागा आणी सर्व अपेक्षा पोलिसांवर लादण्या ऐवजी प्रत्येकाने कायद्याला मदत करा - जिल्हा पोलिस अधिक्षक ए.राजा यांचे आवाहन.,
अवैद्य धंद्या संदर्भात नागरिकांनी थेट संपर्क साधण्याचे स.पो.अ. पंकज कुमावत यांचे आवाहन.
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
आपल्या परिसरात घडत असलेले गुन्हे रोखण्या संदर्भात नागरिकांनीही सजग राहणे आवश्यक असून गुन्हे रोखण्यासाठी सर्वांच्या मदतीची अपेक्षा जिल्हा पोलीस अधीक्षक ए राजा यांनी व्यक्त केली तर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अवैद्य धंद्यासंदर्भात नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करीत अन्याय अत्याचारा संदर्भात कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
केज पोलीस स्टेशनमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक ए राजा, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पोलिसांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे त्यामुळे आहे ती कुमक वापरून पोलीस यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहे त्यामुळे गुन्हे रोखण्या संदर्भात प्रत्येक सूज्ञ नागरिकांनी पोलिसांना मदत करणे आवश्यक आहे. तसेच छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण तंटे करण्यापेक्षा सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक आहे. तसेच गुन्हे रोखण्या संदर्भात व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही लावणे, खाजगी सुरक्षा रक्षक नेमणे इत्यादी उपाय योजनांची माहिती सांगितले. तर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी त्यांच्या हद्दीतील अवैद्य धंदे रोखण्यासंदर्भात थेट संपर्क साधण्याचे आवाहन करीत अन्याय अत्याचारा संदर्भात कोणतेही गुन्हे टाळले गेले नाही पाहिजे हे सांगितले. तसेच छोट्या व्यावसायिकांना जागा उपलब्ध करण्या संदर्भात कार्यवाही व्हायला हवी याची माहिती दिली.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी, प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षक प्रमोद यादव सर्व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाला जनविकास परिवर्तन आघाडीचे हारुनभाई इनामदार, सामाजिक कार्यकर्त्या सौ सिताताई बनसोड महेश जाजू,दलील इनामदार, शिवसेनेचे रत्नाकर शिंदे, भाजपचे दत्ता धस, काँग्रेसचे बाळासाहेब ठोंबरे, व्यापारी महासंघाचे महादेव सूर्यवंशी, केज विकास संघर्ष समितीचे प्रा. हनुमंत भोसले, रिपाइंचे राहुल सरवदे,भास्कर मस्के, बाळासाहेब ओव्हाळ,वंचित आघाडीचे निलेश साखरे यांच्यासह व्यापारी राजकीय मंडळी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सरपंच पोलीस पाटील हे उपस्थित होते.

