shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हत्तीरोग विभागातर्फे अमरावती जिल्ह्यात पोस्ट MDA सर्वेक्षण


अमरावती :- 20 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2021 या दरम्यान अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथकाद्वारे पोस्ट MDA सर्वेक्षणा अंतर्गत 5 ते 9 वयोगटातील लहान मुलामुलींचे रक्तनमुने रात्री 8.30 पासून 11 वाजेपर्यंत घेण्यात येत आहेत त्याचबरोबर सकाळी डास संकलन व किटक सर्वेक्षण कार्यक्रम मा.सहायक संचालक डॉ.भंडारी सर (हिवताप व हत्तीरोग) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे दि.20 ऑक्टोबर रोजी या सर्वेक्षण मोहिमेला सुरवात झाली.

मा.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.शरद जोगी सर,मा.जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ.जुनेद सर अवैद्यकीय आरोग्य अधिकारी श्री.मुंद्रे सर यांच्या नेतृत्वाखाली व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रवीण चकुले सर,आरोग्य सहायक सुधाकर चोपकर सर,तांत्रिक विभागप्रमुख प्रकाश दातीर सर यांच्या सहकार्याने अमरावती जिल्ह्यातील विविध ठिकाणी सर्वेक्षण चालू आहे. 

सदर मोहिमेच्या टीममध्ये राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण उपपथक तळेगाव दशासर,धामणगाव रेल्वे, कुऱ्हा,तळवेल,वलगाव,मोर्शी,वरुड येथील सर्व आरोग्य सहायक,आरोग्य कर्मचारी व नियमित क्षेत्र कर्मचारी हे आहेत व आरोग्य शिक्षण देऊन सर्वेक्षणाचे काम पाहत आहेत.
close