"संपूर्ण गाव हे माझे कुटुंब आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे !" आण्णासाहेब निमगिरे
प्रतिनिधी : सूर्यकांत होनप
करमाळा : ४ / करमाळा तालुक्यातील जेऊरवाडी येथील ग्रामस्थांसाठी मोफत कोरोना लसीकरण कॅम्पचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यानिमित्त ज्या कर्मचाऱ्यांनी हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी आपले योगदान दिले त्यांचा गावचे मा. सरपंच अण्णासाहेब निमगिरे यांनी शाल पुष्पहार आणि नारळ देऊन छोटेखानी सत्कार केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेऊरवाडी येथील मा .सरपंच आदरणीय आण्णासाहेब निमगिरे होते .
भविष्यात आरोग्यविषयक शिबिरे मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहेत. त्यावेळी ग्रामस्थांनी उस्फुर्त सहभागी व्हावे असे आवाहन मा .सरपंच आण्णासाहेब निमगिरे यांनी यावेळी बोलताना केले.
भारत हायस्कूल जेऊर येथील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्राध्यापक संजयकुमार राजेघोरपडे सर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपले मार्गदर्शन करताना सांगितले की गावचे सरपंच गावासाठी काय करतात याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून मी अण्णासाहेब निमगिरे यांच्या कार्याकडे पहात आहे. त्यांच्या कार्याला मी सलाम करतो आणि इतर सर्व गावातील जनतेने आपल्या सरपंचांना अशीच साथ दिली तर सर्व गावे अशीच प्रगतीच्या दिशेने जातील.
सत्काराला उत्तर देताना सिस्टर वंदना गायकवाड यांनी सांगितले की आपल्या गावचे सरपंच आदरणीय अण्णासाहेब निमगिरे यांनी आपल्या गावात लसीकरणाचा कॅम्प घेण्यासाठी आमचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जो पाठपुरावा केला जो आग्रह धरला तो विशेष होता. कारण गावातील वृद्ध वयस्कर ज्येष्ठ गावकऱ्यांची सेवा करणे हे सरपंचांच्या मनात असेल तरच असे लसीकरणाचे कॅम्प गावात यशस्वी होतात. अण्णासाहेब निमगिरे यांची गावकऱ्यांसाठी जी काम करण्याची धडपड आहे आणि तीव्र इच्छा आहे अशी तीव्र इच्छा मी कुठेही पाहिली नाही.
जेऊरवाडी येथील ग्रामस्थांसाठी सुमारे 200 मोफत कोरोना लसी उपलब्ध करून दिल्या होत्या आणि त्यानिमित्ताने सर्व गावकऱ्यांचे प्रबोधन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किसन कांबळे यांनी केले. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडून मिळालेल्या कोरोना च्या दोन्हीही लसी घेतल्या तर आपले संरक्षण होत आहे म्हणून गावकऱ्यांनी निश्चिंत राहावे. या लसी मोफत आहेत यासाठी गावकऱ्यांनी याचा लाभ घेणे अत्यावश्यक आहे.
यावेळी गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सुमारे 179 जनांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.
जेऊरवाडी येथील ग्रामस्थांचे कोरोना मोफत लसीकरण करण्यासाठी जेऊरवाडी येथील आरोग्य सेविका वंदना गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एक पथक आले होते त्यामध्ये आदरणीय प्रतिभा भोसले सिस्टर आणि रवी थोरात यांचा समावेश होता. या पथकाला मदत करण्यासाठी अंगणवाडी सेविका शारदा वेदपाठक मिनी अंगणवाडी सेविका सीमा निमगिरे आणि सुनीताताई निमगिरे या उपस्थित होत्या तर गावकर्यांचे मोबाईलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी जेऊरवाडी येथील ग्रामसेवक ठाकरे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर वाडी चे मुख्याध्यापक किसन कांबळे सर मदत करीत होते. मोबाईल मध्ये झालेल्या रजिस्ट्रेशन ची पडताळणी रवी थोरात यांनी केली आणि रजिस्टर मध्ये प्रत्येक नागरिकांची व गावकर्यांची नोंदणी प्राथमिक शिक्षक अमोल रणशूर यांनी केली.
18 वर्ष वयोगट यावरील सर्व ग्रामस्थ यांना सोशल डिस्टन्स फिजिकल डिस्टन्स यांचे पालन करण्यासाठी आणि रांगेत येण्यासाठी ची माहिती जेऊरवाडी ग्रामपंचायत चे कर्मचारी दादा निमगिरे यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसन कांबळे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अमोल रणशूर यांनी मानले.

