shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेकापचा पराभव करण्यासाठी एकीचे बळ करून उठवणार रान आमदार महेंद्र दळवी..!!

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती  निवडणुकांसाठी शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस युती

राजेश बाष्टे अलिबाग प्रतिनिधी :-

अलिबाग-मुरुडसाठी महेंद्र दळवी यांची घोषणा; शेकापचा पराभव करण्यासाठी एकीचे बळ
अलिबाग, ता. 3: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी विधानसभेच्या अलिबाग-मुरुड मतदार संघासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. महेंद्र दळवी यांनी नवे समिकरण जुळवून आणले आहे. शेतकरी कामगार पक्षाला या मतदार संघातून हद्दपार करण्यासाठी बलाढ्य शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढविणार असल्याची घोषणा महेंद्र दळवी यांनी रविवार (ता.3) रोजी राजमळा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली. 




या नव्या समिकरणाची जुळवणी मागिल काही दिवसांपासून सुरु होती. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच ही त्रिपक्षीय आघाडी झाली असल्याची माहिती आ. महेंद्र दळवी यांनी आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिली. या एकीच्या बळाने आपण शेकापला या मतदार संघातून हद्दपार करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. नव्या आघाडीमुळे शेकाप एकाकी पडला आहे. त्यांच्या नेत्यांना पराभव समोर दिसू लागल्यान शेकापचे नेते अर्थहिन आरोप करु लागले आहेत. त्यांच्या आरोपांना आणि धमक्यांना घाबरण्याची वेळ संपली असून शेकापचे अनेक वर्षांचे वर्चस्व संपवण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहनही आ. महेंद्र दळवी यांनी कार्यकर्त्यांना केले. राजमळा येथील मेळाव्यास जिल्हापरिषदेचे विरोधी पक्ष नेता सुरेंद्र म्हात्रे, शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, मुरुड तालुका प्रमुख श्रीकांत डोंगरीकर महिला जिल्हा संघटीका दिपेश्री पोटंफोडे जिल्हा खजिनदार सुरेश म्हात्रे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष निगडे ॲड.सुशील पाटील यांच्यासह अलिबाग मुरुड तालुक्यातील शिवसेना उप तालुका प्रमुख विभाग प्रमुख महिला आघाडी च्या पदाधिकारी संपर्क प्रमुख शिवसेना शाखा प्रमुख उप शाखा प्रमुख आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
close