shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येणाऱ्या निवडणूकांमध्ये पुर्ण ताकदीने उतरणार - प्रदीप गारटकर.

  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येणाऱ्या  निवडणूकांमध्ये पुर्ण ताकदीने उतरणार -  प्रदीप गारटकर.
इंदापूर येथे (दि.३) ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व फ्रन्टल व विविध सेलच्या तालुकाध्यक्षांची महत्वपूर्ण आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर यांनी  मार्गदर्शन केले.

इंदापूर तालुक्यातील येणाऱ्या विविध निवडणूकांमध्ये राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुर्ण ताकदीने उतरणार असून सर्वच निवडणूकांमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस च्या माध्यमातून घवघवीत यश संपादन करणार असल्याचा विश्वास यावेळी बोलताना गारटकर  व्यक्त केला.

यापुढे बोलताना गारटकर म्हणाले की, सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सत्तेत असून उपमुख्यमंत्री अजित पवार, दत्तात्रय भरणे हे राज्य मंत्रिमंडळामध्ये कार्यक्षम मंत्री म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर आपल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या माध्यमातून होत असलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम सर्व तालुकाध्यक्षांनी करणे गरजेचे आहे. अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय भरणे इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी रात्र-दिवस मेहनत घेत असून, त्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे इंदापूर तालुक्यामध्ये खेचून आणली जात आहेत. त्यामुळे विकासकामांच्या बाबतीमध्ये इंदापूर तालुका अग्रेसर राहण्यासाठी आपले नेतेमंडळी प्रयत्न करत असताना पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपणही याची प्रसिद्धी जनमानसामध्ये करणे आवश्यक असल्याचे गारटकर यांनी उपस्थितांना सांगितले.

कोरोना महामारीच्या काळामुळे आपल्याला संघटनात्मक बांधणी करताना थोड्याबहुत प्रमाणावर अडचणी आल्या परंतु आत्ता मात्र  आपापल्या सेलचा विस्तार अजून व्यापक होण्याच्या दृष्टीने सर्वच रेंटल सेलच्या तालुकाध्यक्षांनी जोमाने कामास सुरुवात करण्याचे आदेश ही यावेळी गारटकरांनी सर्व फ्रंटल सेलच्या तालुकाध्यक्ष यांना दिले.

यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजीराव पानसरे, महिला अध्यक्ष छाया पडसळकर, युवक तालुकाध्यक्ष  शुभम निंबाळकर,  युवती अध्यक्षा अश्विनी राऊत  कुर्डे कार्याध्यक्ष सचिन खामगळ, पदवीधर सेलचे रमेश पाटील, सहकार सेलचे साहेबराव चोपडे, किसान सेलचे देविदास निंबाळकर, उद्योग व व्यापार सेलचे विनोद कारंडे,ओबीसी सेलचे तुकाराम करे, भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे अण्णासाहेब धोत्रे, संघटक सोमनाथ पवार,सामाजिक न्याय विभागाचे शितलचंद्र कांबळे, अल्पसंख्यांक सेलचे इक्बाल शेख, सेवादलाचे दत्तात्रय मोरे,कला साहित्य व चित्रपट सेलचे सचिन रणपिसे, डॉक्टर सेलचे डॉ.अमोल खानावरे,अपंग सेलचे दत्ताजी बाबर ,  सोशल मीडियाचे हामा पाटील,शिक्षक सेलचे सुनील मोहिते आदी तालुकाध्यक्ष उपस्थित होते.
close