प्रकाश मुंडे| बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज येथील सर्वपरिचित व्यक्तिमत्व स्व. लक्ष्मणराव डोईफोडे यांच्या जयंतीनिमित्त शनिवार रोजी बीड येथील इन्फंट इंडिया या संस्थेतील मुलांना फळे व अत्यावश्यक वस्तू वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.
सामाजिक सेवेमध्ये स्व. प्रा.लक्ष्मणराव डोईफोडे यांनी योगदान दिलेले होते,त्यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी स्व.लक्ष्मणराव डोईफोडे सामाजिक प्रतिष्ठान,केज च्या वतीने अमोल दादा डोईफोडे,प्रा.अतुल जाधव,डॉ.विजय मोराळे, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम(नितीन) सत्वधर,रणजित खोडसे,अक्षय गीते,चेतन नेहरकर,सावन ओव्हाळ,अशोक सानप,अप्पासाहेब वायबसे,राहुल डोईफोडे,विजय नेहरकर,अतिष गाढवे सर आदींची उपस्थिती होती.
केज तालुक्यातील आदर्श व्यक्तीमत्व राहिलेले व शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिलेले प्रा. लक्ष्मणराव डोईफोडे सर यांच्या जयंतीनिमित्त हा स्तुत्य उपक्रम हाती घेऊन युवा नेते अमोल डोईफोडे यांनी आदर्श निर्माण केला आहे.

